पुणे : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफांवर एकापाठोपाठ एक भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या भाजप नेते किरीट सोमय्या यांना, पोलिसांकरवी त्यांच्या घरीच स्थानबद्ध करण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला गेल्यानंतर, या कारवाईला झुगारून त्यांनी रेल्वेने कोल्हापूर गाठण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी त्यांना कराडमधेच गाठून थांबण्याची विनंती केली. त्यांनतर सोमय्यांनी कराडमध्ये पत्रकार परिषद घेऊन लवकरच मुश्रीफ यांचा तिसराही घोटाळा बाहेर काढणार असल्याचे सांगितले.
भाजपकडून राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेसला आव्हान, दिला नवा उमेदवार
दरम्यान, यावेळी त्यांनी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशाने या कारवाया होत असल्याचा आरोप केला. यावर आता, ‘या प्रकरणाशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा अजिबात हस्तक्षेप नाही. काल कोल्हापूरात जी परिस्थिती निर्माण झाली त्यावर स्थानिक पोलिसांनी ती माहिती गृहविभागाला कळविली. त्यांनतर आदेशाची अमंलबजावणी करण्यात आली. पोलिसांनी नियमाप्रमाणेच सोमय्यांना कराडमध्ये थांबवले,’ असे प्रतिपादन गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांनी केले आहे.
‘गडहिंग्लज आणि पारनेर साखर कारखान्यात घोटाळे, उद्या ईडीला पुरावे देणार!
‘गृहमंत्रालय शरद पवारांच्या आदेशानुसार चालते,’ असा आरोप देखील सोमय्यांनी केला होता. त्यावर वळसे पाटील यांनी स्पष्टीकरण दिले. दरम्यान, सोमय्यांवरील कारवाईनंतर भाजप नेते चांगेलच आक्रमक झाले आणि त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. गृहमंत्रालय आणि मुख्यमंत्री कार्यालयाने मिळून ही कारवाई चुकीच्या हेतूने केली असल्याचे मत भाजप नेते प्रविण दरेकर यांनी मांडले आहे. मात्र आता त्यावर स्वतः गृहमंत्र्यांनी गोष्टी स्पष्ट केल्या.
शिवसेनेतच जुंपली! कॅबिनेट मंत्र्याने केलेल्या नियुक्त्या आमदाराने केल्या रद्द
दरम्यान, सोमय्या यांनी पुन्हा एकदा मुश्रीफांच्या घोटाळ्यावर प्रतिक्रिया दिली असून, ‘गडहिंग्लज साखर कारखान्यातल्या १०० कोटींच्या घोटाळ्याची माहिती आणि या संदर्भातील सगळे पुरावे मी उद्या ईडीकडे देणार असून, यासंदर्भात तक्रारही करणार आहे. ठाकरे सरकार आल्यानंतर त्यांनी हा साखर कारखाना कसा काबीज केला, कसा बेनामी कंपनीला दिला, हे मी सांगणार आहे,’ असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे, मुश्रीफ गोत्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Read Also :
- ‘चप्पल दाखवणं सोप्पं, ईडीला फेस करणं कठीण! तोंडाला फेस येईल’ पाटलांचा टोला
- देवेंद्र फडणवीस दबंग नेते, १०० अजित पवारांना खिशात घालून फिरतात – चंद्रकात पाटील
- कुणी ऑफर दिली मुश्रीफांसाहेबांना? आम्ही काय ऑफर लेटर घेऊन फिरत असतो काय? – फडणवीस
- ‘पुढच्या आठवड्यात मुश्रीफांचा तिसराही घोटाळा बाहेर आणणार!’
- २ काँग्रेस नेत्यांचेही घोटाळे बाहेर येणार! पाटलांच्या विधानाने खळबळ