सिंधुदुर्ग : शरद पवार तोडगा कधीच काढत नाही. खेळवत ठेवणं त्यांचं काम आहे. कधीच काढणार नाही.’ अशी घणाघाती टीका भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला नारायण राणे यांनी सावंतवाडी येथे भेट दिली. त्यावेळी त्यांनी एसटी संपावरुन महाविकास आघाडी सरकारसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली.
आगीत तेल ओतण्याचे काम करु नये; संजय राऊतांच्या फडणवीसांना कानपिचक्या
‘एसटीच्या संपाबाबत अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यालाच म्हणतात शरद पवार.. शरद पवार तोडगा कधीच काढत नाही. खेळवत ठेवणं त्यांचं काम आहे. कधीच काढणार नाही. ते आदेश देऊ शकत नाहीत? ज्यांनी सरकार बनवलं ते शरद पवार सांगू शकत नाही? कर्मचाऱ्यांना न्याय द्या ताबडतोब. एवढं तरी सांगायला पाहिजे ना. अरे कमीत कमी आम्ही विलिनीकरण एवढ्या दिवसात करु.. तोपर्यंत पगार, ग्रेडेशन का करत नाही?’
कोनशिलावर राष्ट्रवादीच्या मंत्र्याच नावं चुकलं; अजित पवारांनी चक्क डोक्यालाच हात लावला
‘आतापर्यंत दोन ग्रेडेशन पेंडिंग आहेत. अरे मग एक-एक तरी करा आणि कामावर घ्या. निलंबितांना कामावर घ्या. हे प्रश्न शरद पवारांनी बोलून दाखवले पाहिजे. सरकारला सांगितलं पाहिजे करा. अर्थमंत्र्याला बाजूला बसून फायदा काय त्या अजित पवारला? त्यामुळे शरद पवार हे कुठलाही राज्याचा प्रश्न सोडवत नाहीत.’ अशी थेट टीका नारायण राणे यांनी पवारांवर केली आहे. महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीत एसटीचा विषय येतो एसटीचा एवढे दिवस संप आणि जवळपास 40 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली. भयावह परिस्थिती त्या सगळ्यांच्या घरी आहे. असं असताना राज्य सरकार हा प्रश्न ज्या प्रकारे खेळवतंय, या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतंय त्यांच्या जीवनमरणाचा हा प्रश्न आहे.
संजय राऊत शरद पवार यांच्या भेटीला; ST संपाबाबत चर्चा?
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला हे सरकार गांभीर्याने घेत नसताना केंद्र सरकारने सरळ महाराष्ट्र सरकारला निर्देश द्यावेत की, हा प्रश्न त्वरित मिटवा अन्यथा राज्यपालांकडे आम्ही हे अधिकार देऊ वगैरे. आम्ही जो मार्ग काढायचा आहे त्याबद्दल मी स्वतः अमित शहांशी आणि पंतप्रधानांशी बोलेन यातून मार्ग लवकरच काढावा आणि कर्मचाऱ्यांना वाचवावं एवढ मी सांगेन. तसंच राज्यांमधे जे कोण परिवहन मंत्री आहेत कर्मचाऱ्यांच्या हितासाठी मी त्यांच्याशी सुद्धा बोलेन. पण आता हट्ट सोडा आणि तुम्ही न्याय देण्याच्या दृष्टीने चर्चेला लागा. हे मी त्यांना पण सांगेन.’ असंही राणे यावेळी म्हणाले.
Read Also :
- पुण्यात मनसेला मोठा धक्का; ‘हा’ बडा नेता पक्ष सोडण्याची चर्चा ?
- ‘ओह माय गॉड! क्रांती जी’ म्हणत मलिकांनी क्रांती रेडेकरांचे चॅट केले व्हायरल; चॅटमध्ये होते ‘हे’ गुपित
- सरकारचं मंत्रालय बंद, दुकानदारी मात्र सुरू, महत्त्वाचे मंत्रीच भ्रष्टाचाराने बरबटलेतं – पंकजा मुंडे
- नाचता येईना, अंगण वाकडं’ अशी ठाकरे सरकारची अवस्था झाली – प्रीतम मुंडे
- शशिकांत शिंदेचा गेम करणाऱ्यांचा निषेध; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी साताऱ्यातील कार्यालय फोडले