कोरोनामुळे निधन झालेले नगरसेवक दत्ता साने यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार पोहोचले. कोरोनाशी मुकाबला करताना शनिवारी पहाटे दत्ता साने यांनी अखेरचा श्वास घेतला. दत्ता साने यांच्या निधनानंतर यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांचे सांत्वन करण्यासाठी आज स्वतः शरद पवार दत्ता साने यांच्या घरी पोहचले
आदरणीय खा. शरद पवार साहेबांनी आज पिंपरी-चिंचवड येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक आणि माजी विरोधी पक्ष नेते स्व. दत्ता साने यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.@PawarSpeaks #condolence #Visit pic.twitter.com/M88QKvGU23
— NCP (@NCPspeaks) July 7, 2020
लॉकडाऊनच्या काळात गरजूंना धान्य वाटप करताना दत्ता साने यांना कोरोना संसर्ग झाला होता. नगरसेवक दत्ता साने यांना 25 जूनला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. सुरुवातीला त्यांना काही प्रमाणात कोरोनाची लक्षणं आढळली. मात्र, नंतर त्यांना श्वास घेण्यास त्रास सुरु झाला. त्यातच आज ह्रदय विकाराचा झटका आल्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
पुण्यासह जिल्ह्यातील इतर भागात सातत्याने कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.