राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सोलापूर दौऱ्यावर आहेत. सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विनंतीवरुन पवारांनी दौऱ्याचे नियोजन केले. आरोग्यमंत्री राजेश टोपेही शरद पवार यांच्यासोबत आहेत.
शरद पवार रविवारी सकाळी 8 वाजून 25 मिनिटांनी बारामतीतील ‘गोविंद बाग’मधील निवासस्थानाहून सोलापूरकडे रवाना झाले. त्यांच्यासोबत आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणेही दौऱ्यात सहभागी झाले आहेत.
शरद पवार हे सोलापूरमधील ‘कोरोना’च्या परिस्थितीचा आढावा घेऊन खबरदारी आणि उपाय योजनांबाबत मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे पवारांच्या दौऱ्याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.
दरम्यान, सोलापूरमध्ये संचारबंदीचा आजचा तिसरा दिवस असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे. सोलापूर महापालिकेची आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. एक लाख जणांची अँटीजन रॅपिड टेस्ट होणार आहे.