मुंबई : सध्या राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार केंद्रस्थानी आले आहेत. राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेसच्या राहुल गांधींची भेट घेतली. या भेटीनंतर प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये सहभागी होतील असे संकेत दिले गेले. मात्र याच भेटीनंतर आणखी एका चर्चेला मोठं उधाण आलं आहे. आगामी ‘राष्ट्रपती’पदाच्या निवडणुकीसाठी शरद पवार यांचा चेहरा पुढे करावा यासाठी प्रशांत किशोर लॉबिंग करत असल्याची दिल्लीत चर्चा आहे. याच दरम्यान भाजपाचे नेते सुधिर मुनगंटीवार यांनी शरद पवारांवर जोरदार निशाणा साधला आहे. “कधी राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून सांगतात… कधी पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून सांगतात… नेमके कोणत्या पदाचे उमेदवार आहेत, हे शरद पवारांनीच स्पष्ट कराव” असा टोला मुनगंटीवार यांनी लगावला आहे.
राज्यमंत्री बच्चू कडू यांना नौटंकी करण्याची जुनीच सवय; रवी राणा यांची टीका
मुनगंटीवार म्हणाले, “शरद पवार यांनी पंतप्रधानपदाची महत्वाकांक्षा ठेवतात, ही आशर्याची गोष्ट आहे. अनेक वेळा त्यांच्याकडून सांगण्यात येते की, शरद पवार पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत. कधी कधी सांगण्यात येते की, ते राष्ट्रपतीपदाचे उमेदवार आहेत. यांसह अनेक बाबींबद्दल उमेदवाराच्या नावाने शरद पवारांचा चेहरा दाखलवा जातो. परंतू, एक लक्षात घ्या, राष्ट्रपती पदाचा किंवा पंतप्रधान पदाचा उमेदावार कोणालाही होता येते. पण, निवडणूक झाल्यास भाजपचाच पंतप्रधान आणि राष्ट्रपती होणार हे निश्चित आहे, असे सुधिर मुनगंटीवार यांनी सांगितले.
महाराष्ट्रावरचं मोठं संकट टळलं, मात्र… राज्य सरकारचा मोठा निर्णय!
ते म्हणाले, शरद पवार राष्ट्रपती व्हावे, ही त्यांच्या कार्यकर्त्यांची भावना आहे. हे स्वाभाविक आहे. पवारांनी देशाचे नेतृत्व करावे, असे त्यांना वाटते. तसे झाल्यास आम्हालाही आनंदच आहे. परंतू, राष्ट्रपतीपदाची निवडणूक विचारात घेतली तरी लोकसभा आणि राज्यसभेत भाजपाचं बहुमत आहे, त्यामुळे राष्ट्रपती हा भाजपाचाच उमेदवार होईल. पण निवडणूकीच्या रिंगणात उमेदवार म्हणून कोणालाही उभे राहता येते. तसेच त्यांना वाटत असेल. शरद पवारांनी खऱ्या अर्थाने नेमके कोणत्या पदाचे उमेदवार आहेत. हे त्यांनी स्पष्ट करावे, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.
Read Also :
- बहुमत आहे तर घाबरता का? विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घ्या, पाहूया ताकद – फडणवीसांच चॅलेंज
- आरक्षणाचे नेतृत्व तुम्ही करा, मी सपोर्ट करतो; फडणवीसांची भुजबळांना राजकीय साद
- विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी खलबतं; महाविकास आघाडी थेट नियमच बदलणार!
- छगन भुजबळ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; कोण करणार ओबीसींचे नेतृत्व?
- संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिमंडळात सामील केल्यास, मुख्यमंत्र्यांना घेराव घालणार’; उमा खापरेंचा इशारा