मुंबई : काँग्रेसची अवस्था एखाद्या जमीनदारासारखी झाली आहे, असं विधान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलं होतं. पवारांच्या या विधानाशी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी असहमती दर्शविली आहे. तसेच पवारांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावं असं खुलं आवतनच बाळासाहेब थोरात यांनी शरद पवार यांना दिलं आहे. त्यामुळे थोरात यांच्या या आवतनावर राष्ट्रवादीकडून काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.
शिवसेना आणि राष्ट्रवादीचे ते नेते कोण? सोमवारी फुटणार राजकीय बॉम्ब
बाळासाहेब थोरात यांनी मीडियाशी बोलताना शरद पवार यांना थेट काँग्रेसमध्ये येण्याचं आवाहन केलं. तसेच काँग्रेसची अवस्था जमीनदारी गेलेल्या जमीनदारासारखी झाली आहे या पवारांच्या विधानाशी असहमत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. पवारांच्या विधानाशी मी असहमत आहे. त्यांच्या विधानाचा काहीच परिणाम होणार नाही. विरोधकांनी या विधानाचा कितीही राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न केला तरी काँग्रेसचं काही नुकसान होणार नाही. पण अपेक्षा अशी आहे की, या विचाराचे जे आहेत. राज्यघटनेच्या मूलभूत तत्त्वाशी जे बांधिल आहेत. त्यांनी अशी टीका करण्यापेक्षा बरोबर यावं. एकत्रं यावं. काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्रं यावं आणि लोकशाही तसेच राज्यघटना टिकवण्यासाठी एकत्रं लढाई करावी, असं आवाहन थोरात यांनी केलं.
मन सुन्न! नराधमांना फाशीच झाली पाहिजे – देवेंद्र फडणवीस
काँग्रेस हा एक विचार आहे. काँग्रेसच्या विचारला कठीण दिवस आले आहेत. कारण धार्मिक भेदाभेद करणारे वाढले आहेत. आपण एका विचाराचे आहोत. आपण सर्व एकत्र आलो तर काँग्रेसला पुन्हा चांगले दिवस येतील, असं ते म्हणाले.
Read Also :
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत शिवसेना 80 ते 90 जागा लढविणार – संजय राऊत
- लावणी सम्राज्ञी सुरेका पुणेकर राष्ट्रवादीत ठुमका लावणार; मुंबईत रंगणार पक्षप्रवेश सोहळा
- टार्ग्रेट पूर्ण करा, गळ्यात फुलांची माळ पडेल, नाहीतर…; नितिन गडकरींची प्राध्यापकांना तंबी
- मुंबईची प्रतिमा डागाळू नये यासाठी सतर्क राहा; साकीनाका प्रकरणानंतर मुख्यमंत्र्यांच्या पोलीसांना सूचना
- उद्धव ठाकरेंनी भरचौकात थोबाडीत मारली तरी आम्ही सत्ता सोडणार नाही; काँग्रेस नेत्याबद्दल चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट