पुणे : पुणे लोकसभेचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. पुण्यामध्ये खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गिरीश बापट हे कसबा विधानसभा (Kasba VIdhansabha) मतदारसंघातून सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. २०१९ साली त्यांनी पुणे लोकसभा (Pune Loksabha) मतदारसंघात मोठा विजय मिळवला होता. ते कार्यकर्त्यांमध्ये ‘भाऊ’ म्हणून लोकप्रिय होते. गिरीश बापटांच्या निधनानंतर राष्ट्रवादीकडून त्यांना भावपुर्ण श्रध्दाजंली वाहण्यात आली आहे.
हेही वाचा…“एकही आरोप सिद्ध केल्यास आमदारकीचा राजीनामा देईन,” संजय शिरसाठांचं सुषमा अंधारे यांना आवाहन
पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. चार दशकांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत गिरीश बापट यांनी नेहमीच सर्वसमावेशक भूमिका घेत राजकीय प्रवास केला. पुण्यातील लोकांच्या मनात पक्के स्थान निर्माण करत त्यांनी पुणेकरांच्या व कामगारांच्या प्रश्नांसाठी नेहमीच काम केले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एक सर्वपक्षीय जनसंपर्क जोपासणारे राजकीय नेते आपण गमावले आहेत. गिरीश बापट यांना भावपूर्ण श्रद्धांजली. असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…हाजीर हो….! उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे अन् संजय राऊतांना उच्च न्यायालयाकडून समन्स
तर माझे लोकसभेतील सहकारी आणि पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांचे निधन झाले. ही बातमी अतिशय दुःखद आहे. सलग पाच वेळा पुण्यातून ते आमदार म्हणून विधानसभेत निवडून गेले.त्यांना काही काळ राज्य मंत्रिमंडळातही काम करण्याची संधी लाभली होती. त्यांच्या निधनामुळे एक मनमिळाऊ स्वभावाचे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले. अशी भावना खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे. तर राज्याचे माजी मंत्री, विद्यमान खासदार सन्माननीय गिरीश बापट यांचं निधन हे पुणे जिल्ह्यातल्या आम्हा सर्वपक्षीय राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांसाठी मोठा धक्का आहे. महाराष्ट्राचं सर्वसमावेशक, सुसंस्कृत राजकारणाचा चेहरा म्हणून गिरीशभाऊंकडे पाहिलं जायचं. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! असं राज्याचे विधीमंडळाचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलंय.
राज्याचे माजी मंत्री, विद्यमान खासदार सन्माननीय गिरीश बापट यांचं निधन हे पुणे जिल्ह्यातल्या आम्हा सर्वपक्षीय राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांसाठी मोठा धक्का आहे. महाराष्ट्राचं सर्वसमावेशक, सुसंस्कृत राजकारणाचा चेहरा म्हणून गिरीशभाऊंकडे पाहिलं जायचं. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! pic.twitter.com/gyrwqDqi4n
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) March 29, 2023
पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. चार दशकांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत गिरीश बापट यांनी नेहमीच सर्वसमावेशक भूमिका घेत राजकीय प्रवास केला. #GirishBapat pic.twitter.com/qkATwWyx46
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 29, 2023
Read also
हेही वाचा…“१९ महिन्यांचा तुरूंगवास, पाच वेळा आमदार, खासदार, संघाचा कार्यकर्ता,” गिरीश बापटाचा संघर्षमय प्रवास
हेही वाचा…पुण्यातील राजकारणातल्या ‘किंग मेकर’ ची अखेर प्राणज्योत मालवली, खासदार गिरीश बापटाचं निधन
हेही वाचा…“बाळासाहेब ठाकरेंच्या सभेला मैदानं खाली होती, पण आता..”, तानाजी सावंतांचं विधान, राजकारण तापणार
हेही वाचा…“तर १६ आमदार अपात्र ठरल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागेल”, मोठ्या नेत्याचा दावा, निकालाची उत्सुकता शिगेला
हेही वाचा…पुण्यातील भाजपचे खासदार गिरीश बापट यांची प्रकृती खालावली, रूग्णालयात दाखल