पिंपरी, 17 जानेवारी: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी आज सोमवारी मेट्रो कामाची अचानक पाहणी केली. नियोजित दौरा नसताना त्यांनी सकाळी अचानक भेट देऊन मेट्रोच्या कामाचा संपूर्ण आढावा जाणून घेतला. या धावपळीत राष्ट्रवादीचे पदाधिकारी शहराच्या प्रथम नागरिक महापौर उषा उर्फ माई ढोरे यांना आमंत्रित करायला विसरले. यातून राष्ट्रवादीचा दिशाहीन, आणि समन्वय नसल्याचा स्थानिक कारभार यानिमित्ताने पहायला मिळाले.
कोल्हापूर जिल्ह्यातील अडीच हजार एसटी कर्मचाऱ्यांना चंद्रकांत दादा शिधा वाटप करणार
शरद पवार यांनी सोमवारी सकाळी फुगेवाडी मेट्रो स्थानकाला भेट दिली. तिथून त्यांनी मेट्रोतून पिंपरी चिंचवड महापालिका (पीसीएमसी) मेट्रो स्थानकापर्यंत प्रवास केला. यावेळी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित त्यांच्यासोबत उपस्थित होते.
डॉ. दीक्षित यांनी मेट्रोच्या संपूर्ण कामाची शरद पवार यांना माहिती दिली. फुगेवाडी कार्यालयात मेट्रोकडून शरद पवार यांना मेट्रोच्या कामाबद्दलचे प्रेझेंटेशन देण्यात आले. शरद पवार यांनी मेट्रोच्या अधिका-यांशी संवाद साधत मेट्रोच्या कामाबद्दल माहिती जाणून घेतली.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी आज मेट्रो अधिकाऱ्यांची भेट घेऊन मेट्रोचे काम कुठपर्यंत पोहचले? उरलेले काम कधीपर्यंत पूर्ण होईल? कामात काही अडचण येत आहे का? मेट्रोच्या कामासाठी कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे आदी माहिती या अधिकाऱ्यांकडून पवार यांनी जाणून घेतली.
राजेश टोपेजी तुम्ही डॉक्टर आहात, मग इंदुरीकरांना दरवेळी का पाठीशी घालतायं? तृप्ती देसाई
नेतृत्वहीन स्थानिक कारभार उघड
पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वच अलबेल आहे. असे वरवर दाखवले जात असले तरी स्थानिक नेत्यांचेच गट तट पडले असल्याचेच चित्र आहे. यातूनच नेतृत्वहीन दिशाहीन कारभाराचे चित्र संपूर्ण शहर पाहत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या या पाहणी दौर्याबद्दल ही राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना पुरेशी माहिती नव्हती. त्यामुळे त्यांची देखील धावाधाव झालेली पाहायला मिळाली अगदी शरद पवार निघायच्या तयारीत असताना पदाधिकारी तिथंपर्यंत जाऊन पोहोचले. या सर्व गोंधळात शहराच्या प्रथम नागरिक महापौर माई ढोरे यांनादेखील निमंत्रित करायला विसरली.
दरम्यान यावेळी राष्ट्रवादी काॅग्रेसचे अंकुश काकडे, आमदार आण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, पिंपरीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, नगरसेवक नाना काटे आदी उपस्थित होते.
Read also:
- “चंद्रकांत पाटील हे काही राजकीय चर्चेचे केंद्रबिंदू नाहीत, त्यांच्या बोलण्याने फरक पडत नाही”; संजय राऊतांचे पाटलांना चिमटे
- “मुख्यमंत्री साहेब प्रश्न विचारायला नाही तर सोडवायला अक्कल लागते”; चित्रा वाघ यांचा ठाकरेंना सणसणीत टोला
- ठाण्यात खारेगाव रेल्वेच्या पुलाच्या कामाच्या श्रेयवादावरून राष्ट्रवादी-सेनेत जुंपली
- नागवडे सहकारी साखर कारखान्यात आमदार बबनराव पाचपुते गटाचा दारुण पराभव; राजेंद्र नागवडेंनी २१च्या २१ जागा जिंकल्या
- फडणवीसांचा एक मास्टरस्ट्रोक आणि महेश लांडगेंची गोव्यात एन्ट्री