पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातील विविध प्रश्नांदर्भात पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे व माजी आमदार विलास लांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची बारामती येथे भेट घेतली. भेटीदरम्यान शहरातील विविध प्रश्नांवर सर्वांगीण चर्चा झाली असल्याचे आमदार बनसोडे व माजी आमदार लांडे यांनी सांगितले. मी स्वतः शहरासाठी वेळ देईन, असे आश्वासन शरद पवार यांनी दिल्याचेही आजी-माजी आमदारांनी सांगितले. त्यामुळे, आगामी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीची राष्ट्रवादीने मोर्चेबांधणी सुरू केली असल्याची चर्चा शहरातील वर्तुळात सुरू आहे.
आजी-माजी आमदारांनी चर्चेदरम्यान बोपखेलच्या रस्त्याचा प्रश्न व पिंपरी रेल्वे स्टेशन लगत असलेल्या डेअरी फार्मची जागा रेल्वे प्रशासनाला देऊन त्या ठिकाणी सुसज्ज असे जंक्शन करण्यात यावे, अशी मागणी केली. लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयातून (सीएमई) बोपखेल गावात जाणारा रस्ता लष्कराने बंद केल्याने गावकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे बोपखेलवासियांसाठी खडकीला जोडणारा पूल बांधण्याचे ५० कोटी रुपये खर्चाचे काम कोर्टाच्या आदेशाने निविदा काढून महापालिकेने हाती घेतलेले असून सुमारे ३० ते ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. केंद्र सरकारच्या दुर्लक्षामुळे काम सध्या बंद आहे. लष्कर हद्दीतील काम working Permission नसल्याने बंद ठेवण्यात आलेले असून संरक्षण विभागाकडून मिळावी, यासाठी महापालिका अधिकारी संरक्षण विभागाशी संपर्कात असून पवार साहेबांना या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली असल्याचे आमदार बनसोडे यांनी सांगितले.
कोल्हापूरकरांचा उर भरुन आला; शहिदाच्या बहिणीकडे राखी बांधायला आमदार भाऊ आला !
याबरोबरच कासारवाडी आणि पिंपरी रेल्वे स्थानकांदरम्यान असलेल्या डेअरी फार्म येथील जागेवर रेल्वे जंक्शन करावे. जेणे करून शहरात रोजगाराचे नवे धोरण तयार होऊ शकेल. रेल्वे जंक्शन होण्याने शहरात परराज्यात जाणाऱ्या तसेच मुंबई-पुणेदरम्यान डेली प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची मोठी सोय होऊ शकते. डेअरी फार्म सध्या वापरात नसून जागा पडून आहे. ही जागा रेल्वे विभागाला द्यावी. त्या ठिकाणी रेल्वे जंक्शन करण्यात यावे. परिणामी, शहराचा नावलौकिक वाढून प्रवाशांची मोठी सोय होईल. सध्या सर्व प्रवाशांना पिंपरी-चिंचवड येथून पुणे स्टेशन येथे जाऊन आपली रेल्वे पकडावी लागते. अथवा येताना पुणे येथे उतरून पुनः शहरांकडे उलटा प्रवास करावा लागतो. प्रवाशांचा वेळ व पैसा वाया जातो.
कोरोना मधून जगायचं, महागाईमध्ये मरायचं; दरवाढी विरोधात पुण्यात राष्ट्रवादीचे जागरण गोंधळ आंदोलन
याचबरोबर अनधिकृत बांधकामे आणि शास्तीकराची टांगती तलवार, भाजपने चालवलेला सावळा कारभार, नागरिकांच्या पैशांची लूट आदी मुद्देही आजी-माजी आमदारांनी पवार यांच्यासमोर मांडले. त्यावर मी स्वतः शहरासाठी वेळ देईन, असे आश्वासन शरद पवार यांनी दिल्याचे आमदार बनसोडे व लांडे यांनी सांगितले.
Read Also :
- पिंपरी चिंचवड लाच प्रकरण: स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांना जामिन मंजूर, चौघांना न्यायालयीन कोठडी
- छगन भुजबळ अचानक दिल्लीला रवाना; देशातील बड्या वकीलाची घेणार भेट
- देगलूर पोटनिवडणुकीची मोर्चेबांधणी : काँग्रेसच्या बैठकीला अर्धाडझन मंत्र्यांची उपस्थिती
- नारायण राणेंना सूक्ष्म उद्योग खातं मिळालं आणि त्यांचं डोकंही सूक्ष्म झालं – शिवसेना
- म्हाडाचे मंत्री तळियेत फिरकलेच नाहीत! शिवसेना आमदाराचे आव्हाडांना खडेबोल