नुकताच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांची मुलाखत घेतली असून त्याचा रविवारी दुसरा भाग प्रकाशित करण्यात आला आहे. मात्र, मुलाखत म्हणजे डब्ल्यूडब्ल्यूएफ किंवा नुरा कुस्ती आहे… मॅच फिक्सिंग आहे, असा टोला विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी फडणवीस ते म्हणाले की, मॅच फिक्सिंग एकदा संपू द्या. योग्य वेळी मी त्यावर प्रतिक्रिया निश्चित देईल. आज सरकार पाडण्यासाठी कोणताही प्रयत्न होत नसतानाही त्यांच्याकडूनच सरकार पाडण्याच्या वावड्या उठवल्या जात आहे. कोरोनाचा संकटकाळात भाजप असे काम करणार नाही. असेही ते म्हणाले.
“स्वतःच मारून घ्यायचं आणि स्वतःच रडायचं ही एक नवीन पद्धत आहे. ती पद्धत जर अवलंबली तर आपल्या अपयशापासून लोकांची नजर बाजूला होते. त्यातलाच हा प्रकार आहे. कोणीही सरकार पाडत नाहीये. आपणच कांगावा करायचा, त्याच्यावर मुलाखती करायच्या, त्याच्यावरच बोलायचं, जेणेकरून करोनाचे प्रश्न दूर होतील, असा हा प्रयत्न आहे. मला वाटतं त्यांनी करोनाकडे लक्ष द्यायला हवं.”असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.