‘मी बघतोय की अनेकजण कंगनाच्या विरोधात बोलत आहेत. खरंतर ते आतून कंगनावर जळतात, असे म्हणत अभिनेते शत्रुघन सिन्हा यांनी कंगनाला पाठिंबा दर्शवला आहे. अभिनेत्री कंगना रनौत हिने सध्या बॉलिवूडमधील घऱाणेशाहीविरोधात मोर्चा खोलला आहे. यात अनेक चाहत्यांनी तिला पाठिंबा दिला असला तरी तापसी पन्नू, स्वरा भास्कर या अभिनेत्रींनी तिच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
बॉलिवूडमधून कंगनाच्या बाजूने कुणी बोलत नसतानाच आता शत्रुघ्न सिन्हाने कंगनाची बाजू घेत तिला समर्थन दर्शवले आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘मी बघतोय की अनेकजण कंगनाच्या विरोधात बोलत आहेत. खरंतर ते आतून कंगनावर जळतात. आपल्या दयेशिवाय, आपल्या इच्छेविरोधात, आपला ग्रुपमध्ये न येता, आपला आशिर्वाद न घेता ही मुलगी फार दुरवर पोहोचली आहे. खूप काही कमावले आहे तिने. तिच्या यशाने आणि बहादूरीमुळे लोकं जळतायत.
यावेळी त्यांनी करण जोहरच्या कॉफी विथ करण या कार्यक्रमावर देखील टीका केली. ‘आमच्यावेळी हे कॉफी विथ अर्जुन साऱखे आधीच प्लान केलेले कार्यक्रम नव्हते. अशा कार्यक्रमांमुळे कॉन्ट्रोव्हर्सी निर्माण होतात. आतापर्यंत ज्यांच्याबद्दल चर्चा होतेय ते आपल्याच समाजाचे सदस्य आहेत. पण ही इंडस्ट्री कुणा एकाची नाही. त्यामुळे या व्यक्तीवर बहिष्कार घाला, याला इंडस्ट्रीतून काढून टाका असे कुणीच नाही बोलू शकत