महाजॉब्सच्या जाहिरातीत केवळ शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो असल्याने, त्यावर युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर आता प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
महाजॉब्सच्या जाहिरातीत काँग्रेस पक्षाच्या नेत्याचे फोटो असणे गरजेचे आहे. सरकारचा भाग म्हणून सत्यजीत यांनी ट्वीट केले असेल. उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी फोन करुन संबंधित प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली आहे, असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे.
मुख्यमंत्री आणि आमच्यात संवाद वाढला पाहिजे, गेले काही दिवस कोरोना काळात कमी झाला होता, आता मागील आठवड्यात भेटलो होतो. काही विषयावर चर्चाही झाली, अशी माहितीही थोरात यांनी दिली.