मुंबई : मागच्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रात एक प्रकरण कमालीचे गाजले होते. हे प्रकरण दुसरे तिसरे कोणते नसून आर्यन खान ड्रग्झ प्रकरण. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी दबंग कारवाई केली होती असं त्यावेळी बोललं जात होतं. एनसीबीचे समीर वानखेडे आता महाराष्ट्रात खूप मोठे धमाके करणार असं देखील त्यावेळी बोललं जातं होतं.
10 मार्चपर्यंत कामावर या, अन्यथा…; परिवहनमंत्री परबांचा एसटी कर्मचाऱ्यांना इशारा
मात्र हे प्रकरण म्हणजेच एक बनाव होता असं नुकतंच समोर आलं आहे. एनसीबीने नियुक्त केलेल्या एसआयटीने दिलेल्या अहवालात म्हटलं आहे की आर्यन खानकडे ड्रग्झ सापडलेच नव्हते. एवढंच नाही तर एनसीबीचा जो नियम आहे की जेव्हा धाड होते तेव्हा त्याचे विडिओ रेकॉर्डिंग करावे लागते असे कोणतेही रेकॉर्डिंग समोर आलेले नाही. आता भाजपचे नेते मोहित भारतीय (कंबोज) यांनी या प्रकरणात उडी घेतली आहे. मध्यन्तरी संजय राऊत यांनी एका घोटाळ्याबाबत मोहित भारतीय याचे नाव घेतले होते होते.
ओबीसी आरक्षणावर अजित पवारांनी सांगितला फॉर्मुला; सोमवारी बिल देखील मांडणार
मोहित भारतीय म्हणाले की मुंबई पोलिसांनी एसएटी या प्रकरणात नोंदवली आहे. मुंबई पोलीस या प्रकरणात खंडणीचा प्रकार आहे की नाही याचा तपास सुरु आहे. मुंबई पोलिस आयुक्तांनी या प्रकरणात तपास करून एफआयआर दाखल करण्यात यावा. मला तुम्ही कधीही चौकशीसाठी बोलवा, मी तयार आहे. माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. सलीम जावेदची स्टोरी बनवली आहे. आजच्या अधिवेशनात काहीजण बसलेले आहेत आणि यांचा खोटेपणा देशासमोर यायलाच व्हावा. या प्रकरणात सुनील पाटील, प्रभाकर सलील, शिवसेनेचा एक मंत्री, काँग्रेसचे एक मंत्री ? असा कुणाकुणाचा समावेश त्यात आहे, त्यांची भूमिका काय आहे याबाबत सगळं सत्य बाहेर काढणार आहे असं देखील मोहित भारतीय यांनी म्हटलं आहे.
Read also:
- विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी अजितदादांचं राज्यपालांना साकडं; कोश्यारी निर्णय घेणार?
- मनोज कटके हल्ला प्रकरण; देवेंद्र फडणवीसांचा पोलिसांना इशारा, म्हणाले…
- नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्याला राष्ट्रवादी करणार जोरदार विरोध; विराट मूक मोर्चाचे आयोजन
- नवाब मालिक राजीनामा द्या; विधानसभेच्या आवारात भाजपकडून स्वाक्षरी मोहीम
- विधानसभा अध्यक्षीय निवडणूक 9 मार्चला प्रस्तापित; त्या 12 आमदारांचा देखील प्रश्न सुटणार