मुंबई : राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यासाठी शिवसेनेकडून अयोध्यामध्ये जोरदार तयारी करण्यात आली आहे. या दौऱ्यानिमित्ताने आदित्य ठाकरे रामलल्लाची आरती. पत्रकार परिषद, आणि इस्कॉन मंदिराला भेट देणार असा भरगच्च कार्यक्रम आखण्यात आला आहे. त्यासाठी नाशिक, पुणे आणि मुंबईतून हजारो शिवसैनिक अयोध्यामध्ये दाखल झाले आहेत. यावर आता शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे.
“वारकर्यांच्या आनंदात मिठाचा खडा टाकू नका”; प्रवीण दरेकरांची राष्ट्रवादीवर खोचक टिप्पणी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची भूमिका घेतल्यानंतर त्यांनी लगेच अयोध्या दौरा जाहीर केला होता. मात्र काही कारणास्तव आणि भाजपचे खासदार बृजभुषण सिंह यांनी आव्हान दिल्यानंतर 6 जूनचा अयोध्या दौरा मनसेने स्थगित केला. त्यानंतर त्यांच्यावर जोरदार राज्यातील राजकीय नेत्यांनी टिका केली. त्यानंतर आता आदित्य ठाकरे यांचा अयोध्या आज आहे.
बाळासाहेबांची हिंदुत्वाची पंरपरा आदित्य ठाकरे यांनी कायम राखली आहे. नकली हिंदुत्वाची शाल पांघरलेल्या स्वयंघोषित हिंदुजननायकांनी अयोध्येत दिसू नये हिच श्रीरामांची इच्छा आहे. अशी खोचक टिप्पणी दिपाली सय्यद यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावली. त्यामुळे आता मनसेकडून काय प्रतिक्रिया येणार ते आता पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकाच व्यासपीठावर; उद्धव ठाकरेंनी मानले मोदींचे आभार
दरम्यान, आदित्य ठाकरे आज सकाळी लखनऊ विमानतळावर पोहचणार असून ते दुपारी इस्कॉन मंदिराच्या भेटीनंतर एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यानंतर हनुमान गढी आणि रामललाचे सायंकाळी दर्शन घेऊन शरयु नदीच्या घाटावर आरती देखील करणार आहेत. त्यानंतर सांयकाळी ते मुंबईकडे रवाना होणार आहेत. त्यामुळे शिवसैनिकांकडून मोठी तयारी करण्यात आली असून आदित्य ठाकरे यांचे पोस्टर देखील लावण्यात आले आहेत.
Read also:
- “आदित्य ठाकरे अयोध्येला पाप धुण्यासाठी गेले”; रवी राणांचं शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल
- “पंकजाताई माझी मोठी बहिण, कोणीही मुर्खपणा करू नये”; निलेश राणेंनी भाजपच्याच नेत्याला खडसावलं
- “फडणवीससाहेबांचा मुख्यमंत्री होण्याचा आजार फार गंभीर झालाय, त्यांना उपचाराची गरज”; रूपाली पाटील
- “नरेंद्र मोदी उत्तम नेते नसले तरी उत्तम अभिनेते”; राष्ट्रवादीची खोचक प्रतिक्रिया
- “सौ पाप करके बिल्ली म्याऊ म्याऊ करने अयोध्या चली”; नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंना पुन्हा डिवचलं