मुंबई : शिवसेना आणि भाजपच्या राजकीय मतभेदानंतर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक भुमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेत आहेत. त्यामुळे भाजप आता मनसे सोबत युती करण्याची तयारी करत आहे. भाजपचे अनेक नेते राज ठाकरे यांची भेट घेत आहेत. यावरून आता शिवसेकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राज ठाकरे यांचा हिंदुत्वाचा मुकवटा खाली उतरला आहे, अशी टिका शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी राज ठाकरे यांच्यावर केली आहे.
“शिक्षकांचा प्रतिनिधी हा विधिमंडळात हवाच”; भाजप आमदाराच्या मागणीला राष्ट्रवादीचा विरोध
राज ठाकरे यांनी 2014 आणि 2019 अश्या अनेक वेळा भाजपवर टिका केली होती. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातुन अनेक वेळा त्यांनी भाजपवर टिका केली आहे. राज ठाकरे यांचा हिंदुत्वाचा मुकवटा खाली उतरला आहे, अशी घणाघाती टिका शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी राज ठाकरे यांच्यावर केली आहे.
“प्रशांत बंब यांचं मानसिक संतुलन बिघडलंय का?”; शिक्षक आमदाराचा सवाल
कितीही सत्तेसाठी लाचारी..ज्या लोकांनी तुम्हाला शिव्या घातल्या. आज त्याच लोकांशी तुम्ही युती करताय. असली कोण आणि नकली कोणा हे आता जनतेला कळलं आहे. हिंदुत्वासाठी ते सुरत, गुवाहटी, गोव्याला गेले हे जनतेला दिसत आहे. मात्र यांना सत्तेच्या हव्यासापोटी आणि इडीच्या भितीने हे सगळे तिकडे गेलेले हे लोकांना समजले आहे, असा टोला शिंदे-फडणवीस सरकारला मनिषा कायंदे यांनी लगावला आहे.
“आदित्य हे ठाकरे कुटुंबाचे वारसदार असू शकतात, शिवसेनेच्या विचारांचे नाही”
आमच्या कार्यालयासमोर त्यांचं ऑफिस होणार आहे. शिवसेना दसरा मेळावा घेते म्हणुन त्यांना दसरा मेळावा घ्यायचा आहे. त्यांनी दसरा मेळावा म्हणजे पोरखेळ चालवला आहे. दसरा मेळाव्याला बाळासाहेबांचे विचार ऐकण्यासाठी उभा महाराष्ट्र तिकडे येत होता. आणि आता उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकायला येतात, असंही मनिषा कायंदे म्हणाल्या आहेत.
Read also
- “शिवसेनाप्रमुख म्हणून नाही पण प्रमुख नेते म्हणून एकनाथ शिंदे मार्गदर्शन करणार “; सदा सरवणकर
- “दानवे यांनी जास्त फडफड करू नये”; शिंदे गटाचा दानवेंना इशारा
- “मोदी सरकार हे भांडवलदारांचे सरकार”; राष्ट्रवादीचा घणाघाती आरोप
- “राज ठाकरेंच्या भेटीसाठी जावं, राजकीय युती करू नये”; भाजपला रामदास आठवलेंचा सल्ला
- काँग्रेसला खिंडार पडणार?; अशोक चव्हाण आणि फडणवीसांची भेट, चर्चांना उधान