मुंबई : शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना ईडीने समन्स बजावून आज २० ऑक्टोबरला चौकशीसाठी हजर राहण्यास आदेश दिले होते. मात्र, त्या आज चौकशीला हजर राहू शकणार नाहीत. त्याबाबत वकीलामार्फत त्यांनी ईडी कार्यालायाला पत्र दिले असून चिकन गुनियाची लागण झाली असल्यामुळे आणखी १५ दिवसांची वेळ मागवून घेतली आहे.
अजिबात टेंन्शन घेवू नका, महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येत नाही – राजेश टोपे
गेल्या दोन दिवसांपूर्वी ईडीने भावना गवळी यांना दुसरं समन्स बजावलं होतं. त्यांना २० ऑक्टोबरला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, आज त्यांचे वकील इंद्रपाल सिंह ईडी कार्यालयात हजर झाले होते. खासदार गवळी या १३ ऑक्टोबरपासून आजारी असून त्यांच्यावर शासकीय डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत. त्यांना चिकन गुनियाचे निदान झाले असून त्याचा अहवाल ईडीला दिला आहे. त्यामुळे ईडीला १५ दिवसांची वेळ मागून घेतली आहे, असे गवळी यांचे वकील इंद्रपाल सिंह यांनी सांगितले. तसेच भावना गवळी याप्रकरणात स्वतः तक्रारदार आहेत. त्यामुळे याविरोधात लवकरच नागपूर न्यायालयात आरोपपत्र दाखल होईल. भावना गवळी यांचे काही राजकीय कार्यक्रम देखील आहेत. यामुळे त्या चौकशीसाठी हजर राहू शकत नाही, असेही सिंह म्हणाले.
व्हायरलं ऑडिओ क्लिप प्रकरण पडलं महागात; शिवसेनेतून रामदास कदमांचा पत्ता होणार कट?
खासदार गवळी यांना यापूर्वी ४ ऑक्टोबरला ईडीने समन्स बजावून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यावेळी देखील त्यांनी १५ दिवसांची मुदत मागितली होती. त्यानुसार ईडीने त्यांना मुदत दिली होती. मात्र, आता मुदतवाढ संपल्यानंतर त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. मात्र, त्यांनी परत एकदा मुदतवाढ मागितली आहे.
पुण्यात 2022ला आरपीआय’चा महापौर होणार, देवेंद्र फडणवीसांनी शब्द दिलायं – रामदास आठवले
गवळी यांच्या बालाजी पार्टीकल बोर्डमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना देखील किरीट सोमय्या यांनी वाशिम येथे मोर्चा काढला होता. त्यानंतर खासदार गवळींच्या शिक्षण संस्था आणि कृषी उत्पादन संस्थांवर ३० ऑगस्टला ईडीने छापेमारी केली होती. तसेच महिला प्रतिष्ठान या ट्रस्टला कंपनीमध्ये रुपांतर केल्याप्रकरणी सईद खानला अटक करण्यात आली होती.
Read Also :
- आर्यन खानला आज जामीन मिळावा, हीच माझी प्रार्थना आहे; भाजप आमदार राम कदम
- गायब झालेल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना अटक होणार? शोधासाठी तपास यंत्रणा पुन्हा सक्रिय
- देगलुरमध्ये भाजप उमेदवाराला निवडुण द्या, मी गाव जेवण देतो – चंद्रकांत पाटलांची ऑफर
- महापालिका निवडणुकांचं बिगूल वाजलं, आरक्षण सोडतीच्या तारखा जाहीर
- काँग्रेसमध्ये नाराजी: सचिन सावंत यांचा प्रवक्तेपदाचा राजीनामा, अतुल लोंढेंची मुख्य प्रवक्तेपदी निवड