मुंबई : शिवसेनेच्या यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळी यांना अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने 4 ऑक्टोबर म्हणजेच आज उपस्थित राहण्याचं समन्स पाठवलं आहे. भावना गवळी यांचा निकटवर्तीय सईद खान याला अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने यापूर्वीच अटक केली होती. त्यानंतर आता ईडीने आपला मोर्चा भावना गवळी यांच्याकडे वळवला होता. खासदार गवळी आज ईडी चौकशीला हजर राहणार का हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.
निलेश लंकेंच्या पत्राच्या घरात शरद पवारांची बैठक; लाकडी कपाटाला प्लॅस्टिकची खुर्ची टेकवून बसले
भावना गवळी यांना 28 सप्टेंबर रोजी ईडीकडून समन्स बजावण्यात आलं होतं. या समन्स नुसार भावना गवळी यांना आज 4 ऑक्टोबर रोजी म्हणजेच आज हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. समन्सनुसार भावना गवळी यांना आज 11 वाजता ईडी कार्यलयात हजर रहायचं आहे. भावना गवळी आज ईडी कार्यलयात चौकशीसाठी हजर होतात की हजर राहण्यासाठी वेळ मागतात हे पुढच्या काही वेळेत स्पष्ट होईल. ईडीचं समन्स आल्यानंतर भावना गवळी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली होती.
पिंपरी चिंचवड महापालिकेचा बाजीगर कोण? तीन ४३ च्या प्रभाग रचनेत कोणाच्या नाड्या आवळल्या जाणार?
भावना गवळी यांच्या ट्रस्टमध्ये 17 कोटींच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून तपास करण्यात येत आहे. सामाजिक कार्यकर्ते हरिष सारडा यांनी भावना गवळी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. नॅशनल को ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कोऑपरेशन कडून बालाजी सहकारी पार्टिकल बोर्डनं 43.35 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. हरिष सारडा यांनी भावना गवळी यांनी एनसीडीसीकडून कर्ज घेतलं होतं मात्र, ती कंपनी कधीच सुरु केली नव्हती असा दावा केला.
ठाकरे सरकारच्या ३ सदस्यीय प्रभागरचनेला ग्रहण; मनसे न्यायालयात सोमवारी याचिका दाखल करणार
भावना अॅग्रो प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस कंपनीमध्ये अनियमितता केल्याचा देखील आरोप करण्यात आला होता. या कंपनीसाठी दोन वेगवेगळ्या बँकांकडून 7.5 कोटींचं कर्ज घेण्यात आलं होतं. नंतर ही कंपनी भावना गवळी यांच्या खासगी सचिवाला 7.9 कोटी रुपयांना विकल्याचा आरोप करण्यात आला होता.
Read Also :
- मला काही बोलायचे नाही, मी काम करणारा माणूस – अजित पवार
- देवेंद्र फडणवीसांनी मराठवाडा पाहणी दौऱ्यातून बीडला वगळलं; पंकजा मुंडेंचे ट्विट कनेक्शन?
- ऑफिसच्या एसीत बसून मोठे लीडर झाले, त्यांना शेतकऱ्यांचे अश्रू काय समजणार? – फडणवीस
- अभ्यास नको, गप्पा मारा; शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची वर्गात जाऊन भन्नाट सुरूवात
- देवेंद्र फडणवीसांनी पुरग्रस्त भागाची पाहणी करता करता शिवसेना नेता फोडला; लवकरच होणार भाजप प्रवेश