पुणे : काही दिवसांपूर्वी एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊन देखील नोकरी मिळत नसल्यामुळे, स्वप्नील लोणकर या तरुणाने पुण्यात आत्महत्या केल्याची घटना घडली. त्यानंतर राज्यात परत एकदा एमपीएससीची परीक्षा आणि भरती यावरून वादंग निर्माण झाला. अनेक नेत्यांनी स्वप्नीलच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले.
इयत्ता १० वीचा निकाल शुक्रवारी दुपारी १ वाजता जाहीर होणार
यांनतर आज, शिवसेना नेते आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वप्नीलच्या कुटुंबियांची भेट घेतली. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना, स्वप्नीलच्या कुटुंबियांना शिवसेनेकडून १० लाख रुपये मदत देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच, स्वप्नीलच्या बहिणीच्या शिक्षणाचा सगळा खर्च उचलण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
घटक पक्षांचा ठाकरे सरकारला इशारा, कृषी विधेयकं मागे घ्या, अन्यथा..
यावेळी, एमपीएससीचा कारभार पारदर्शक असला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करताना, प्रलंबित भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरु होईल, असं आश्वासनही त्यांनी दिलं आहे.
…आणि फडणवीस म्हणाले…”पंकजांचं भाषण ऐकण्याचा प्रश्न नाही, त्यावर मी बोलण्यात अर्थ नाही”
“राज्य लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा देऊनही नोकरी मिळत नाही, त्यामुळे यात पडू नका. जमले तर हे इतरांपर्यंत पोचवा, अनेक जीव वाचतील,” असा उल्लेख करीत स्वप्नील लोणकर याने आत्महत्या केली. त्यानंतर त्याच्या आई-वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. “एखाद्या मंत्र्यांच्या मुलाने आत्महत्या केली असतीतर, त्यांना आत्महत्येचे दुःख काय असते ते समजे असते,” अशी संतप्त प्रतिक्रिया स्वप्नीलच्या आईने व्यक्त केली होती.
Read Also :
- २३ गावांच्या आराखड्याच्या निर्णयाच्या बाबतीत महाविकास आघाडीची वजीर चाल ‘सक्सेसफुल’
- राष्ट्रवादीच्या बारामतीत भरणार, काँग्रेसचा ओबीसी मेळावा; नाना पटोलेंच्या भूमिकेकडे लक्ष
- महाविकास आघाडी सरकारची डोकेदुखी वाढली; ८ आमदार ठाकरे सरकारमधून बाहेर पडणार?
- “…तर दोन महिन्यांत आघाडी सरकार हे आरक्षण पुन्हा बहाल करून दाखवेल”
- ‘‘वर्गातला एक मुलगा अभ्यास करायचा नाही, पण पहिला यायचा; असंच मुख्यमंत्र्यांचं आहे’’