नवी दिल्ली – उत्तर प्रदेशात शिवसेना काँग्रेससोबत युती करण्याचे संकेत शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिले आहेत. आम्ही उत्तर प्रदेशात चाचपणी करत आहोत. काँग्रेस नेते राहुल गांधींना मी भेटणार आहे. उत्तर प्रदेशातील युतीबाबत चर्चा झाली तर त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, असं संजय राऊत यांनी सांगितलं. त्यामुळे उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आल्यास भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एक बाई स्वातंत्र्याला भीक म्हणते आणि त्यावरती एकही साहित्यिक बोलत नाहीत – बाळासाहेब थोरात
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली. राष्ट्रीय स्तरावर तिसऱ्या आघाडीच्या चर्चा मीडियात आहेत. आमच्यात काही अशी चर्चा झाली नाही. आम्ही मीडियातूनच या चर्चा वाचत आहोत. आज मी राहुल गांधींना भेटत आहे. त्याला तुम्ही कर्टसी व्हिजीट का म्हणत नाही? आम्ही एकमेकांशी संवाद साधतो. काँग्रेस महाविकास आघाडीत आहे. आम्ही किमान समान कार्यक्रमावर सरकार चालवत आहोत. तिन्ही पक्षाशी संवाद असावा वाटतो. त्यामुळे दिल्लीत असल्यावर एकमेकांना भेटून चर्चा करतो. राज्यातील राजकारण, सरकारचं कामकाज आणि देशातील घडामोडीवर यावेळी चर्चा होत असतात, असं सांगतानाच पाच राज्यात निवडणुका आहेत. आम्ही गोव्यात लढत आहोत. उत्तर प्रदेशात चाचपणी सुरू आहे. काँग्रेसही यूपीत लढत आहे. त्यामुळे राहुल गांधींशी उत्तर प्रदेशात लढण्याबाबत चर्चा झाली तर चर्चा करू, असं राऊत म्हणाले.
वीर सावरकरांबद्दल जो वाद झाला तो दुर्दैवी, त्यांना मराठी माणूस विसरू शकत नाही – शरद पवार
शिवसेना गोव्यात स्वबळावर लढण्याचा प्रयत्न करत आहे. शिवसेना तृणमूलच्या आघाडीत नाही. आम्हाला त्यांच्या आघाडीत जायचं नाही. गोव्यात काय होईल हे आम्हाला माहीत आहे. तिथे काय परिस्थिती होईल आम्हाला माहीत आहे. एकवेळ आम्ही स्वतंत्र लढू पण कोणत्या आघाडीत जायचं की नाही याचा निर्णय घेऊ, असंही त्यांनी सांगितलं. गोवा आम्हाला जवळचा आहे. आम्ही अनेकदा निवडणुका लढवतोच. कार्यकर्त्यांची इच्छा असते निवडणुका लढवण्याची. आम्ही मागची निवडणूक युतीत लढलो. पण आम्हाला यश मिळालं नाही. आमचं काम सुरू आहे. पण योग्यवेळी निर्णय घेऊ, असं त्यांनी स्पष्ट केलं.
Read Also :
- श्रीमंत मराठ्यांनी ओबीसींना आरक्षण न देण्याचं ठरवलंय – प्रकाश आंबेडकर
- कोरोनाच्या नावाखाली बिळात बसलेल्या वाघानं आता तरी बाहेर यावं – सदाभाऊ खोत
- …म्हणून शिवेंद्रराजे भोसलेंचा अध्यक्षपदावरून पत्ता कट झाला; शशिकांत शिंदेंनी सांगितले कारण
- एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात आज पगार जमा होणार, पण…: अनिल परबांनी टाकली ‘ही’ अट
- ‘ओबीसींना राजकीय आरक्षण पुन्हा मिळू शकतं’; चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितला तोडगा