मुंबई : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी जळगाव दौऱ्यावर असताना भाजपवर, ‘युती करून सत्तेत असताना शिवसेनेला भाजपकडून गुलामासारखी वागणूक दिली गेली,’ असा गंभीर आरोप केला. तसंच, ‘राज्यात शिवसेनेचे नामोनिशाण संपवण्याचा देखील भाजपकडून प्रयत्न झाला,’ असं खळबळजनक वक्तव्य त्यांनी केलं.
दरम्यान, त्यांच्या या गंभीर वक्तव्यांना आता भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जात असून, आज भाजप नेते निलेश राणे यांनी देखील संजय राऊत यांच्या या आरोपांवर ट्विट करत, ‘खाल्लेल्या ताटात थुंकणे हीच शिवसेनेची सवय आहे,’ असा घणाघात केला आहे.
“संजय राऊत म्हणतात भारतीय जनता पक्षाने एकत्र सत्तेत असताना शिवसेनेला गुलामासारखी वागणूक दिली पण शिवसेना गुलामगिरी सहन करत नाही. पाच वर्ष भारतीय जनता पक्षाबरोबर सत्ता उपभोगली, खाल्लेल्या ताटात थुंकणे हीच सवय शिवसेनेची कायम राहिली आहे. काही तरी लाज शिल्लक असू द्या रे”, असा जोरदार हल्लबोल त्यांनी केला आहे.
संज्या राऊत म्हणतो भारतीय जनता पक्षाने एकत्र सत्तेत असताना शिवसेनेला गुलामासारखी वागणूक दिली पण शिवसेना गुलामगिरी सहन करत नाही. पाच वर्ष भारतीय जनता पक्षाबरोबर सत्ता उपभोगली, खाल्लेल्या ताटात थुंकणे हीच सवय शिवसेनेची कायम राहिली आहे. काही तरी लाज शिल्लक असू द्या रे.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 13, 2021
Read Also :
- नाना भाऊ कसे मुख्यमंत्री होणार? अजित पवारांचे सुचक विधान
- ‘केंद्राकडे बोट दाखवून आघाडी सरकार आपली भूमिका टाळू शकत नाही, राज्य सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी’- शाहू छत्रपती
- आरक्षणप्रश्नी उदयनराजे आणि संभाजीराजेंची आज पुण्यात भेट! भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
- अजित पवार-छत्रपती शाहूंची लक्षवेधी भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
- मोहितेंच्या मनोमिलनासाठी मंत्री विश्वजीत कदम कऱ्हाडमध्ये ठाण मांडून; दोन्ही गटाचे कार्यकर्ते संभ्रमात