कोल्हापूर: जस जशी मतदानाची प्रक्रिया जवळ येत आहे तसं तशी कोल्हापूर उत्तरेत राजकीय जुगलबंदी आणखी रंगतदार होताना दिसत आहे. कोल्हापूर ऊत्तरेत भाजप आणि महाविकास आघाडीने आपली पूर्ण ताकद उतरवलेली दिसत आहे. काहीही झाले तरी विजय आपलाच असं दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून आणि नेत्यांकडून पाहायला मिळत आहे. कोल्हापूर उत्तरेत भाजपकडून प्रचारासाठी आगळीवेगळी संकल्पना राबविली जात आहे ती म्हणजे ‘चाय पे चर्चा’ तर काँग्रेसनेही याबद्दल आपला डाव मांडला असून त्यांनी ‘मिसळ कट्टया’ वर ताव मारत कार्यकर्ते आणि नागरिकांशी चर्चा करण्याचे धोरण अवलंबले आहे. एवढंच नाही तर काँग्रेसनेही ‘चाय पे चर्चा’ चे आयोजन करण्यात येत आहे.
राजकीय वातावरण तापलं; शरद पवारांवर झालेली टीका अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून प्रत्यत्तर
काल काँग्रेस पक्षाच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्याकडून सकाळी मिसळ कट्ट्यावर लोकांशी चर्चा झाली आणि सायंकाळच्या सुमारास त्यांच्याकडून ‘चाय पे चर्चा’ चे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेसकडून पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्यावर जयश्री जाधव यांना निवडून आणण्याची जबाबदारी आहे. स्वत तेही अत्यंत आक्रमकतेने प्रचार करत आहेत. कोल्हापूर उत्तेरत प्रचार करत असताना स्वर्गीय आमदार चंद्रकांत जाधव यांनी कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी तयार केलेले विविध आराखडे आणि आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठीच जयश्री जाधव मैदानात उतरल्या आहेत असं बोललं जातं आहे.
” वरुण गांधींशी राजकीय भेट नव्हती, मात्र चर्चा झाली”; संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ
शिवाजी उद्यमनगर, यादव नगर, राजारामपुरी भागात काँग्रेस पक्षाच्या उमेदवार जयश्री जाधव यांना उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. आमदार ऋतुराज पाटीलही चांगला सहभाग प्रचारात घेत आहेत. शिवसेना मात्र गुलदस्त्यात असून फारशी काही प्रचारात सक्रिय होताना दिसत नाही. त्यामुळे आगामी काळात याचे काय परिमाण होणार याकडे लक्ष लागून आहे.
Read also:
- अजित पवार अतिशय हुशार राजकारणी, ते बरोबर वेळ मारून नेतात; चंद्रकांत पाटलांचा पवारांना टोला
- कोल्हापुर पोटनिवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज; 15 उमेदवारांसाठी 2 हजार 200 कर्मचाऱ्यांची नियक्ती
- शरद पवार, युपीएचं अध्यक्ष पद; राष्ट्रवादीच्या नेत्याची महत्वाची प्रतिक्रिया, म्हणाले..;
- हजारो कोटींचा घोटाळा! दरेकरांना जेलमध्ये टाकलं पाहिजे; आपचे नेते धनंजय शिंदे
- गली गली मैं शोर है,प्रवीण दरेकर चोर है! दरेकरांच्या राजीनाम्यासाठी आपचा मुंबईत एल्गार