मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेचे आमदार झाल्यानंतर जवळजवळ १५ महिन्यानंतर त्यांच्या आमदार निधीचा पहिल्यांदाच वापर केला असल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिक विकास निधी योजनेअंतर्गत ही रक्कम दादरमधील शिवाजी पार्कच्या सुशोभिकरणासाठी वापरण्यात येणार आहे.
हे पण वाचा: मुख्यमंत्र्यांचे एकच धोरण, सगळं केंद्राने करावं, द्याव; मी घरात बसणार किंवा मर्सिडीज चालवणार
स्थानिक परिसराचा विकास करण्यासाठी देण्यात येणारा निधी उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्कच्या सुशोभिकरणासाठी दिला आहे. शिवाजी पार्क हे मुंबईमधील मोजक्या आणि सर्वात मोठ्या मोकळ्या जागेंपैकी एक असून त्याचे आकारमान २२.७ एकर इतके आहे. शिवसेनेचे शिवाजी पार्कसोबत एक खास नाते असून त्याला ऐतिहासिक वारसाही आहे.
हे पण वाचा: अविनाश भोसलेंना ईडीचा दणका, पुण्यातील तब्ब्ल ४ कोटींच्या संपत्तीवर आणली टाच
आमदारांच्या या विकास निधीमधून प्रत्येक आमदाराला त्याच्या स्थानिक परिसरामधील कामांसाठी चार कोटींचा निधी दरवर्षी दिला जातो. १९ मार्च रोजी उद्धव ठाकरेंनी मुंबई शहराचे जिल्हाधिकारी राजीव निवाटकर यांना लिहिलेल्या पत्रामध्ये अनेक ज्येष्ठ मंडळी, स्थानिक नागरिक आणि खेळाडू शिवाजीपार्कच्या परिसरातील फुटपाथचा वापर करतात.
हे पण वाचा: संजय जाधवांच्या विधानावर भाजपाने दिली प्रतिक्रिया, “तुम्ही काहीही करा पण…”
मात्र या ठिकाणी फुटपाथ योग्य स्थितीमध्ये नसून त्यामुळे स्थानिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे . त्यामुळेच मी माझ्या आमदार निधीमधून १ कोटी २५ लाख रुपये फुटपाथ दुरुस्ती आणि सुशोभीकरणासाठी देत आहे, असे म्हटले होते. सामान्यपणे एखाद्या कामासाठी आमदार २५ लाखांपर्यंतचा निधी देऊ शकतो. मात्र या प्रकरणामध्ये विशेष सवलतीअंतर्गत १ कोटी २५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आल्याचे समजते.
हे पण वाचा: अविनाश भोसलेंना ईडीचा दणका, पुण्यातील तब्ब्ल ४ कोटींच्या संपत्तीवर आणली टाच
मुख्यमंत्र्यांनी हा निधी दिल्यानंतर पाच महिन्यांनी मुंबई माहनगरपालिकेने या कामांसंदर्भात निविदा मागवल्या आहेत. सी रामचंद्र चौक ते वीर सावरकर मार्गावरील वसंत देसाई चौकादरम्यानच्या फुटपाथचे शुशोभिकरणासाठी या निवादा मागवण्यात आल्या आहेत. यामध्ये रोषणाई, लाइट बिलबोर्ड्स, पथदिवे, पुतळ्यांवरील स्पॉट लाइट्स, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळील रोषणाई आणि इतर रोषणाईची काम केली जाणार आहेत.
Read Also :
- कपिल सिब्बल यांच्या डिनर पार्टीत, २०२४ मध्ये भाजप मुक्तची घोषणा, अशी असणार रणनिती
- बीड जिल्ह्यामधून निघणाऱ्या डॉ. भागवत कराड यांच्या ‘जनआर्शिवाद’ यात्रेला, पंकजा मुंडेसह कार्यकर्त्यांचा विरोध
- पुन्हा एकदा फडणवीसांची खेळी: संजय कुटे होणार भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष?
- महाराष्ट्र पेटवायला दोन मिनिटं सुद्धा लागणार नाही, संभाजीराजे म्हणतात…..
- शिवसेनेच्या ‘या’ मंत्र्याची माणिकराव ठाकरे यांनी केली तक्रार; आघाडीत धुसफूस?