पुणे : एकीकडे भाजप नेते किरीट सोमय्या सत्तेतील महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांचे गैरव्यवहार आणि गैरप्रकरणे बाहेर काढत असताना, आता पुणे पोलिसांनी राष्ट्रवादीच्या एका आमदारावर आरोपपत्र दाखल केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भोसले यांच्या बरोबर इतर ७ जणांवर हे दोषारोप दाखल करण्यात आलं असून, शिवाजीराव भोसले बँकेच्या ४९६ कोटी ४४ लाख रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात त्यांच्यावर ८ हजार पानांचं दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.
उद्धव ठाकरेंचा थेट आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगमोहन रेड्डीला फोन; नार्वेकराची लागली “या” पदावर वर्णी
सायबर क्राईम आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी याबद्दलची माहिती दिली. या प्रकरणाचा पुणे पोलिसांनी तपास करून, काल शिवाजीनगर सत्र न्यायालयात ७ जणांवर दोषारोपपत्र दाखल केलं. यात, आरोपींनी नियोजनबद्ध कट करून कर्जदार आणि गुंतवणूकदारांची तब्ब्ल ४९६ कोटी ४४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या गैरव्यवहार प्रकरणात अनिल भोसलेंसह ७ जण अटकेत आहेत.
…तर मी सुनिल गावस्करांना दिलेला म्हाडाचा प्लॉट रद्द केला असता – जितेंद्र आव्हाड
दरम्यान, अनिल भोसले, त्यांची पत्नी नगरसेविका रश्मी भोसले यांच्या बरोबर १६ जणांवर, शिवाजी भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. बँकेत एकूण ७१ कोटी ७८ लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. ऑडिटर योगेश लकडे यांनी याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जानेवारीच्या महिन्यात फिर्याद दिली होती. त्यांच्यावर बँकेच्या रेकॉर्डमध्ये बनावट नोंदी खऱ्या दाखवून, हा घोटाळा केल्याचा आरोप आहे.
वाघांची देखभाल मनपा कर्मचारी करु शकतात, मग पेंग्वीनच्या 15 कोटीचा ठेका कुणासाठी? राणे
दुसरीकडे, या घोटाळ्याची व्याप्ती एकूण ३०० कोटींपर्यंत असल्याचा दावा केला जात आहे. तसेच, हाय कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत, भोसलेंसोबत तत्कालीन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्यावरही ठपका ठेवण्यात आला असून, त्यांनीच कारवाईला अडथळा केल्याचा आरोप याचिकेत केला आहे, तर धनंजय मुंडे यांनी १ कोटी ४३ लाख रुपये थकवल्याचं देखील बँकेचं म्हणणं आहे. त्यामुळे, या घोटाळ्यात बड्या राजकारणी नावांचा समावेश असल्याने, नक्कीच हे प्रकरण मोठे रूप घेणार असल्याचे दिसून येत आहे.
Read Also :
- ठाकरे सरकारच्या अध्यादेश म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण – देवेंद्र फडणवीस
- महिलांची अवहेलना करण्याचा अधिकार प्रवीण दरेकरांना कुणी दिला? सुरेखा पुणेकर संतापल्या
- ओबीसी समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी भाजपा कटिबद्ध – देवेंद्र फडणवीस
- मोदी आणि फडणवीस ओबीसी आरक्षणाचे खरे मारेकरी, आंदोलन केवळ नौटंकीसाठी – नाना पटोले
- किरीट सोमय्यांकडे ईडीचं प्रवक्तेपद द्यावं; रोहित पवारांनी उडवली खिल्ली