‘शिवसंग्राम’चे अध्यक्ष विनायक मेटे यांनी आज मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस असून त्यांनी मराठा आरक्षणावरून त्यांना टोला लगावला.
“मुख्यमंत्र्यांनी आपल्या वाढदिवशी, आपण मराठा समाजासोबत आहोत हा विश्वास द्यावा, मराठा समाज त्यांना आशीर्वाद देईल” असे म्हणत विनायक मेटे यांनी उद्धव ठाकरे याना टोला लगावला आहे.
“मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून शिवसंग्राम आणि इतर संघटना प्रयत्न करत आहेत. देवेंद्र फडणवीस सरकार असताना हे आरक्षण टिकवण्याचे प्रयत्न केले. मात्र, काही लोक समाजात दुही माजवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात गेले” असे मेटे म्हणाले.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव व्हिडीओ कॉन्फरन्सवरुन कामकाज करतात, अजित पवार मंत्रालयातून काम करतात. महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे स्टेअरिंग कोणाच्या हातात आहे, असा टोला विनायक मेटे यांनी लगावला.