सातारा – सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नवनियुक्त अध्यक्ष नितीन पाटील आणि उपाध्यक्ष अनिल देसाई जिल्हा बँक अतिशय चांगल्याप्रकारे चालवण्याबरोबरच जिल्हा बँकेचा नावलौकिक कायम राखतील, असा विश्वास माजी अध्यक्ष आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केला. सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडी जाहीर झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांसमोर आपली प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले, ‘सातारा जिल्हा बँक अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर तसेच अन्य संचालक मंडळींनी एकत्र बसून चर्चा केली. अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या दोन्ही निवडी आपल्याला एकमताने करायच्या, असा निर्णय त्यावेळी घेण्यात आला होता आणि तसेच झाले. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडी बिनविरोध करण्याची सातारा जिल्हा बँकेची परंपरा आहे. यावेळीही ती कायम राहिली.
ओमायक्रॉनची चिंता वाढली: राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार? अजित पवार म्हणतात…
त्यानुसार अध्यक्षपदासाठी नितीन पाटील आणि उपाध्यक्षपदासाठी अनिल देसाई यांचे नाव निश्चित केले. शिवेंद्रराजे म्हणाले, ‘नवीन पदाधिकारी सभापती रामराजे, बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँक अतिशय योग्य पद्धतीने चालवतील. जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी संधी पुन्हा मिळावी म्हणून मी स्वत: इच्छुक होतो. माझ्याबरोबरच सत्यजितसिंह पाटणकर, राजेंद्र राजपूरे इच्छुक होते. उपाध्यक्षपदासाठी दत्तानाना ढमाळ आणि शिवरुपराजे खर्डेकर यांनीही इच्छा बोलून दाखवली होती. प्रत्येकांनी इच्छा व्यक्त केली होती. इच्छुकांनी आपली मते मांडली होती. मात्र, दोन्ही निवडी एकमताने करण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार या निवडी बिनविरोध झाल्या आहेत. दरम्यान, उदयनराजे अध्यक्षपदासाठी इच्छुक होते, असा प्रश्न त्यांना विचारला असता त्यावर अधिक बोलण्याचे टाळले. निवडीच्या दिवशी उदयनराजे यांनी सकाळी रामराजेंची भेट घेतली होती. मात्र, त्यांच्यात काय बोलणे झाले, याची माहिती मला नाही.
Read Also :
- ठाकरे सरकारने भ्रष्टाचाराचे रेकॉर्ड मोडले; भाजप नेते गिरीष महाजनांचा गंभीर आरोप
- शिवसेना गोव्यात स्वबळावर तर उत्तर प्रदेशात काँग्रेससोबत युती करणार?, संजय राऊतांनी केले स्पष्ट..
- श्रीमंत मराठ्यांनी ओबीसींना आरक्षण न देण्याचं ठरवलंय – प्रकाश आंबेडकर
- कोरोनाच्या नावाखाली बिळात बसलेल्या वाघानं आता तरी बाहेर यावं – सदाभाऊ खोत
- …म्हणून शिवेंद्रराजे भोसलेंचा अध्यक्षपदावरून पत्ता कट झाला; शशिकांत शिंदेंनी सांगितले कारण