मुंबई : शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब, दापोली साई रिसॉर्ट घोटाळ्या प्रकरणी चांगलेच अडचणीत सापडणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी भाजप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मंत्री अनिल परब यांच्यावर काही गंभीर आरोप केले होते. तसेच, त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती.
हे पण वाचा, आणखी एक मंत्री मंत्रिमंडळातून जाणार? अनिल परबांच्या अडचणीत वाढ
दरम्यान, यांनतर त्यांच्या तक्रारीची दखल, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या विभागाने घेतली असून, परब यांच्या रत्नागिरी येथील अलिशान रिसॉर्टची त्यांनी पाहणी केली. महामारी काळात कोट्यवधी रुपये खर्च करून परब यांनी, समुद्रकिनारी बेकायदेशीर पॉपर्टी खरेदी करुन, हे ‘साई रिसॉर्ट’ बांधले आहे, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे.
हे पण वाचा, अनिल परबांच्या अडचणी वाढण्याची शक्यता?, ‘त्या’ रिसॉर्टची चौकशीचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
यानंतर, आता परत सोमय्या यांनी परबांविरोधात पुरावे उघड केले असून, त्यांनी आता या साई रिसॅार्टचे मालक, हे अनिल परबच असल्याचे म्हटले आहे. त्यांनी या सदर्भात ट्वीट केले आहे, त्यामध्ये त्यांनी म्हटले की, ”ग्रामपंचायत व महावितरणच्या नोंदी दापोली साई रिसॉर्टचे मालक अनिल परब आहे.” असा दावा सोमय्या यांनी केला आहे. तसेच त्यांनी ट्विटसोबत काही नोंदणीची कागदपत्रं देखील टाकली आहेत.
Grampanchayat & Maha Vitaran MSEDCL records says Anil Parab Owner of Dapoli Sai Resort
ग्रामपंचायत व महावितरण महावितरणच्या नोंदी
दापोली साई रिसॉर्टचे मालक अनिल परब आहे @BJP4Maharashtra @BJP4India @Dev_Fadnavis pic.twitter.com/qqhH14T5zP— Kirit Somaiya (@KiritSomaiya) June 22, 2021
हे पण वाचा, शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप
सोमय्या यांनी या आधीही एक ट्वीट केले होते. त्यामध्ये ते म्हटले होते की ”अनील परब हे “साई रिसॉर्ट दापोली” चे मालक आहेत. त्यांनी मुरुड ग्रामपंचायत कडे अर्ज करुन जमीन आपल्या नावावर हस्तांतरित करण्यास सांगितले आहे. त्यांनी विभाश साठे यांच्याकडून मालमत्ता सर्वेक्षण क्रमांक ४४६ खरेदी केली. हे अनिल परब यांना हस्तांतरित हाऊस नंबर 1074 होते. त्यांनी मालमत्ता कर व वीज उपकर 4 हजार 680 रुपये भरला आहे. त्याचा पावती क्रमांक 40 आहे.” असे सोमय्या यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. त्या सोबतच त्यांनी कर पावती आणि अर्जही पोस्ट केला होता.
Read Also :
- सांगलीतील आटपाडी या मूळ गावानं मला घडवलं; वर्धापनदिनी मुख्य संपादक राजीव खांडेकरांच्या भावना
- निवडणुकीत पत्ता कट केलेल्या भाजपच्या मेधा कुलकर्णींचे अखेर राजकीय पुनर्वसन
- शरद पवारांच्या पे रोलवर राहण्यापेक्षा शिवसैनिकांच्या व्यथा मांडा; चंद्रकांतदादांचा राऊतांना सल्ला
- राज्यात मांडीला मांडी, पण दिल्लीत पवारांच्या बैठकीला दांडी; संजय राऊत म्हणतात…
- चद्रकांत पाटील म्हणाले; जयंतराव असा त्रास देणे तुम्हाला शोभत नाही