एकीकडे राज्यावर करोनाचं संकट असताना अमरावतीमध्ये सामाजिक स्तरावरील विकृतपणा समोर आला आहे. करोना चाचणीसाठी आलेल्या २४ वर्षीय तरुणीच्या गुप्तांगातून स्वॅब घेण्यात अत्यंत निंदनीय प्रकार घडल्यानंतर राज्यभरातून संतापाची लाट येत आहे. याप्राश्वभूमीवर शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी गृहमंत्र्यांना पत्र लिहून अश्या घटना भविष्यात घडू नये यासाठी सामाजिक प्रबोधन करण्याची मागणी केली आहे.
बडनेरातील मनपाच्या मोदी हॉस्पिटलमध्ये चाचणी साठी सदर मुलगी गेली होती. याठिकाणी काही महिला कर्मचारीही होत्या. या २४ वर्षीय तरुणीच्या नाकातून स्वॅब घेतल्यानंतर त्या ठिकाणी स्वॅब घेण्यासाठी कार्यरत कंत्राटी प्रयोगशाळा तंत्रज्ञ अल्पेश देशमुखने गुप्तांगाचा स्वॅब घ्यावा लागतो, असे सांगून स्वॅब घेतला.
स्वॅब घेण्यासाठी जे मार्गदर्शक तत्वे आहेत ती स्वॅब सेंटरच्या प्रथमदर्शनी भागावर ठळक अक्षरात लावण्यात यावीत. तसेच शक्य झाल्यास महिलांचे स्वॅब घेण्यासाठी महिलामार्फत प्रयोगशाळा तज्ञांच्या मार्फत सूचना सर्व खाजगी रुग्णालयांना करण्यात यावी. दरम्यान पीडित मुलीला मनोधैर्य योजने अंतर्गत मदत मिळण्यासाठी पोलीस विभागाने प्रयत्न करावेत. स्वब घेणाऱ्या ठिकानी महिला कर्मचारी यांची नेमणूक करुन महिला रुग्णांना मार्गदर्शन कराव व अशा घटना भविष्यात घडू नये यासाठी सामाजिक प्रबोधन करण्यात यावे, अशा विविध प्रकारच्या मागण्या नीलम गोऱ्हे यांनी पत्राद्वारे केल्या आहेत.