नवी दिल्ली : भाजप खासदार किरीट सोमय्या, सातत्याने महाविकास आघाडीतील नेत्यांची वादग्रस्त प्रकरणे बाहेर काढत असून, यावेळी त्यांनी, राष्ट्रवादी काँग्रेस नेते व मंत्री छगन भुजबळ यांना ७ वर्षांची शिक्षा होईल आणि शिवसेनेच्या खासदार भावना गवळी याही लवकरच तुरूंगात जातील, असा मोठा दावा केला आहे. २६ ऑगस्टला दिल्लीत जाऊन त्यांनी, अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांची भेट घेतली. तसेच, गवळी यांच्याविरोधात ईडी, आरबीआयकडे तक्रार केली असल्याचं सांगितलं.
Thackeray Sarkar's Minister Chhagan Bhujbal, Ex MP Samir Bhujbal Ex MLA Pankaj Bhujbal's ₹100 crore BENAMI Properties Siezed by Income Tax
ठाकरे सरकारचे मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ माजी आमदार पंकज भुजबळ यांचा ₹100 कोटींचा बेनामी मालमत्ता आयकर विभागाने जप्त केल्या
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) August 25, 2021
याबाबत माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितलं, “गवळींनी १८ कोटींची रोकड काढली आहे. त्यांनी ७ कोटी रूपये घरात ठेवले होते. १०० कोटींचा भ्रष्टाचार त्यांनी केला आहे. याबाबत अर्थ राज्यमंत्र्यांना भेटलो असून, गवळी यांची तक्रार ईडी आणि आरबीआयकडे दाखल केली आहे. गाड्यांवर दगडफेक केल्यानं चौकशी थांबेल, असं ठाकरे यांना वाटत असेल. पण हा भ्रम आहे. गवळी लवकरच जेलमध्ये जातील. घोटाळ्यांना आणि घोटाळादारांना पाठीशी घालण्याचे पाप या सरकारने केले आहे,” अशी टीका त्यांनी केली आहे.
Today at Delhi, Meeting Ministers & Officials to pursue actions against MP Bhavna Gavli & Group Scam & Minister Anil Parab's Fraud
आज दिल्ली येथे, खासदार भावना गवळी ग्रुप घोटाळा आणि मंत्री अनिल परब घोटाळा यांचा
विरुध्द कारवाई, पाठपुरावा करण्यासाठी मंत्री आणि अधिकाऱ्याना भेटणार— Kirit Somaiya (@KiritSomaiya) August 26, 2021
यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं असून, “शिवसेना खासदार भावना गवळी 100 कोटी चा घोटाळा. 18 कोटी रोख रक्कम काढणे, कार्यालयात 7 कोटी रोख ठेवणे, NCDC, SBI ना फसविणे, लवकर कारवाई होणार,” असं ट्विट त्यांनी केलं आहे. तसेच, भुजबळ यांना, १०० कोटींची बेनामी संपत्ती गोळा केल्याप्रकरणी, ७ वर्षांची शिक्षा मिळणार असल्याचं भाकितही त्यांनी केलं असून, आयकर खात्यानं सगळे पुरावे दिले असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
शिवसेना खासदार भावना गवळी ₹ 100 कोटी चा घोटाळा. ₹18 कोटी रोख रक्कम काढणे, कार्यालयात ₹ 7 कोटी रोख ठेवणे NCDC, SBI ना फसविणे
राज्यमंत्री फायनान्स (बँकिंग) डॉ कराड,
राज्यमंत्री फायनान्स (महसूल आयकर) पंकज चौधरी
राज्यमंत्री सहकार् बी एल वर्मा
यांना भेटलो, लवकर कारवाई होणार pic.twitter.com/G8ov852uKR
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) August 26, 2021
Read Also :
- एक सदस्यीय प्रभाग पद्धतीला भाजपचा विरोध, राजकीय संघर्ष निर्माण होण्याची शक्यता
- सोलापुरात वंचितला धक्का बसणार? मोठा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर!
- राणेंच्या अटकेसाठी दबाव टाकल्याचं सिद्ध झाल्यास राजकारणातून सन्यास घेईन – उदय सामंत
- “राजकीय पक्षात मतभेद असतात पण…”, भाजप खासदार गिरीश बापट यांचा राणेंना घरचा आहेर
- केंद्रीय मंत्री नारायण राणे लीलावती रुग्णालयात दाखल