शिरुर : विदर्भाच्या दौऱ्यावर असताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी अनेकदा, “शिवसेनेने पाठीत खंजीर खुपसला”, असं विधान करून भाजप-शिवसेना संघर्ष धगधगत ठेवण्याचं काम केलं. त्यांच्या या विधानाचा समाचार आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतला असून, “आम्ही समोरून कोथळा काढतो, पाठीत खंजीर खुपसत नाही. हे असलं घाणेरडं काम बाळासाहेबांनी आम्हाला कधीच शिकवलं नाही,” असा घणाघाती हल्ला केला आहे.
“भाजपत देखील महिलांना डावललं जातं!”, आमदार मंदा म्हात्रेंचं मोठं विधान
ते आज शिरुरमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी, शिवसैनिकांशी संवाद साधताना, “आम्ही शिवाजी महाराजांची औलाद आहोत. अफजल खानाचा कोथळा पुढून काढलेला, शाहिस्तेखानाची बोटं समोरून तोडलेली. त्यामुळे, पाठीमागून वार करण्याची शिवसेनेची परंपरा नाही. तुम्ही आमच्या पाठीत खंजीर खुपसला. शब्द आम्ही नाही तुम्ही फिरवला,” असा हल्लाबोल केला. तसेच, पाटील यांना मी चंपा म्हणणं योग्य नाही. १०५ वाले डोळे चोळत बसलात. वाटलं ते येतील, पण तसं झालं नाही,” अशी टीका त्यांनी केली.
तिला मरू दे ना…,तु कशाला बदनाम होतोयं…; मंत्री जितेंद्र आव्हाडांकडून बलात्काराच्या आरोपीला अभय ?
तसेच, “आता राज्यात ठाकरे सरकार आहे. अनेकांनी सेनेत प्रवेश केला. अनेक बोचकी शिवसेनेतून गेली. जे गेले त्यांना आता परत जागा नाही,” असं सांगत, “राज्यात ५५ ठिकाणी भगवा फडकला. मला खात्री आहे शिरूर आणि जुन्नर मतदारसंघातही तो फडकेल. सत्ता मनगटात असते. आपल्याकडे आमदार नाही, खासदार नाही, जि.प. नाही. पण मातीवर प्रेम करणारा मुख्यमंत्री आहे. त्यामुळे, आता पुढच्या ३ वर्षांत, निवडणूका येईपर्यंत जे चुकलं आहे, ते मिळवायचं आहे,” असं त्यांनी आवाहन केलं.
१२ आमदाराच्या यादीतून माझं नावं वगळल्यास, राष्ट्रवादीचा करेक्ट कार्यक्रम करणार; राजू शेट्टी आक्रमक
यावेळी, “हे ३ पक्षांचं सरकार असलं तरी ज्याचा मुख्यमंत्री असतो, त्याच सरकार असतं. आता सरकार आपलं आहे. शिवसेना सर्वांच्या वर आहे. शरद पवार, अजित पवार आपले आहेत. काँग्रेस आणि भाजपला अजूनही सेनेची गरज लागते,” असं म्हणत, “देशात पहिल्या पाचमध्ये मुख्यमंत्री आहेत. ते देशाचं नेतृत्व नक्कीच करतील. मात्र त्यांनीच मला इकडे दम देऊन पाठवलं आहे. फार गर्दी नको. मास्क लावा. आपण आपली काळजी घेतली पाहिजे. आपल्या मुख्यमंत्र्यांच्या कामाचं जगानं कौतुक केलं आहे,” असे उद्गार त्यांनी काढले.
Read Also :
- महागाईविरोधात राष्ट्रवादी महिला आघाडी आक्रमक, पंतप्रधानांना शेणाच्या गोवऱ्या भेट
- पंकजा मुंडे यांना मोठा झटका, वैद्यनाथ अर्बन बँकेच्या अधिकाऱ्याला अटक
- परप्रांतीयांना ओबीसीत आरक्षण दयायला भाजपचा विरोध?, चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान
- खडसेंना दणका; ED ने दाखल केलं हजार पानी आरोपपत्र, पत्नी-जावयाचाही आरोपी म्हणून समावेश
- अनिल देशमुख प्रकरणात नवी माहिती समोर, आयफोनसाठी केला चौकशी अहवाल लीक