महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज साठावा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
संजय राऊत यांनी ट्विट करुन म्हटले आहे की, आपण आमच्या आयुष्यात खास आहात. आपणास वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा. देशाचं नेतृत्त्व करण्याची क्षमता आपल्यात आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
“ये दोस्ती….हम नही तोडेंगे…आपण आमच्या आयुष्यात खास आहात…आपणास वाढदिवसांच्या मनःपूर्वक शुभेच्छा! देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता आपल्यात आहे.” अशा शब्दात संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
ये दोस्ती….
हम नही तोडेंगे…
आपण आमच्या आयुष्यात खास आहात…
आपणास वाढदिवसांच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!
देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता आपल्यात आहे..@uddhavthackeray @CMOMaharashtra pic.twitter.com/3HA5puJzBb— Sanjay Raut (@rautsanjay61) July 27, 2020