राज्यात काही महिन्यांपुर्वी अन्य राजकीय घडामोडीनंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांनी एकत्र येत सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. या तिन्हा पक्षांना एकत्र आणण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रमुख भूमिका होती. तेव्हापासूनच या सरकारमध्ये शरद पवार यांची भूमिका ही रिमोट कंट्रोलची आहे की हेडमास्तर असा प्रश्न वारंवार विचारला जात आहे. या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे लवकरच संजय राऊत यंनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये उलगडणार आहे.
ठाकरे सरकारचे आपण रिमोट कंट्रोल आहात की हेडमास्तर?
काय म्हणतात शरद पवार? pic.twitter.com/ot0Y8pdJ0X— Sanjay Raut (@rautsanjay61) July 9, 2020
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या मुलाखतीचा दुसरा टीझर ट्विटरवर शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी शरद पवारानां आपण ठाकरे सरकारचे रिमोट कंट्रोल आहात की हेडमास्तर?, असा प्रश्न विचारला आहे. या प्रश्नाचे उत्तर आता संपुर्ण मुलाखत आल्यानंतरच समजेल.
या टीझरमध्ये शरद पवार हे भाजप, बाळासाहेब ठाकरेंची कार्यशैली, शिवसेना अशा विविध गोष्टींवर बोलत आहेत. दरम्यान, ही मुलाखत दैनिक सामनाच्या वेबसाईटवर 11, 12 आणि 13 जुलैला प्रसिद्ध होणार आहे.