मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी भाजप खासदार संभाजीराजे आंदोलन उभ करत असतानाच, दुसरीकडे भाजपचे नेते नारायण राणे यांनी संभाजीराजेंवरच संशय व्यक्त करत टीका केली होती. पण, ‘छत्रपती संभाजीराजेंचा आदर्श नारायण राणेंनी घेतला पाहिजे’ असा घणाघाती आरोप शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांना खासदार नारायण राणे यांच्यावर केला.
खासदार विनायक राऊत म्हणाले की, छत्रपती संभाजीराजे हे मोठे व्यक्तिमत्त्व आहे, ते आदरणीय असे व्यक्तिमत्व आहेत. मात्र संभाजीराजे आणि नारायण राणे यांची तुलना कधी होऊ शकत नाही. संभाजी राजेंचा आदर्श नारायण राणेंनी घेतला पाहिजे, असे माझे मत असल्याचा टोला राऊत यांना नारायण राणे यांना लगावला आहे.
‘नारायण राणे हे स्वत:च्या स्वार्थसाठी पक्ष बदलत असतो. तशी कारकीर्द संभाजीराजेंची नाही, त्यामुळे नारायण राणेंनी हे त्यांचा आदर्श घेतलाच पाहिजे’, अशी टीकाही राऊत यांनी केली.
मध्यंतरी नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन संभाजीराजे यांच्यावर खोचक अशी टीका केली होती. संभाजीराजे छत्रपती यांची खासदारकीची मुदत संपायला आली असल्याने ते जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये फिरत आहेत. मात्र, जनता त्यांच्या बाजूने आहे का?, असा प्रश्न राणे यांनी उपस्थितीत केला होता. राणेंच्या या टीकेनंतर संभाजीराजे यांनी इशारा देणारे ट्वीट केले होते. या ट्वीटमध्ये संभाजीराजेंनी कोणाचंही नाव न घेता इशारा दिला आहे.
Read Also :
- ‘काँग्रेसला हद्दपार करण्याची भाषा करणाऱ्यांना महाराष्ट्रातून हद्दपार केले’
- ‘मोदींची हिटलरशी तुलना योग्य नाही, हिटलरच्या काळात जर्मनी आर्थिक महासत्ता बनला होता’
- ‘पंतप्रधान स्वतःला फकीर मानतात, मग 15 एकरांच्या घराची गरजच काय?’
- ‘अनलॉक’च्या निर्णयाबाबत गोंधळ का झाला?, मुख्ममंत्री म्हणाले…
- माध्यमांमध्ये जेवढी छाननी आमच्या सरकारची व्हायची, तेवढी आता होत नाही!