मुंबई : मागील काही दिवसांपासून परभणीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्रानी हे कमालीचे चर्चेत आले आहेत. बाबाजानी दुर्राणी यांना एका व्यक्तीनं मारहाण केल्याची घटना नुकतीच समोर आली होती. मारेकरी हा एवढ्यावरच थांबला नव्हता तर त्याने आमदाराला जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती. या धक्कादायक प्रकारानंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी आरोपी विरोधात फिर्याद दाखल करण्यात आली होती आणि आरोपीला अटकही करण्यात आली होती.
पहाटेच्या शपथविधीला दोन वर्षे, चंद्रकांत पाटलांना त्याचेच झटके येत असतील – संजय राऊत
आज सकाळी सकाळीच आमदार बाबाजानी यांनी आपला जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. तडकाफडकी राजीनामा दिल्याने उलटसुलट राजकीय चर्चांना वाव मिळाला आहे. पक्षात त्यांना मागील काळापासून खूप विरोध होत होता. मागील काही काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी देखील त्यांच्या कारभाराला कंटाळून राजीनामा दिला होता.
“महाराष्ट्र केंद्रशासित करा आणि केंद्राला चालवायला द्या”; प्रीतम मुंडे कडाडल्या
बाबाजानी दुर्रानी यांनी देखील काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांविरोधात नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी थेट पक्ष स्रेष्ठीना याबाबत कळवले देखील होते. पक्षात सध्या सुरु असलेला वाद आणि पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळूनच त्यांनी जिल्हाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याचा निर्णय घेतला आहे असं देखील राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा? शरद पवारांच्या परबांना महत्वाच्या सूचना
येत्या काळात परभणी जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर बााबाजानी दुर्रानी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी हा एक झटका असल्याचं बोललं जात आहे. बाबाजानी दुर्रानी हे विधान परिषदेचे आमदार आहेत. त्यांनी आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सोपवला आहे. बाबाजानी दुर्रानी यांच्या राजीनाम्यामुळे येत्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Read Also :
- २५ मतदारांनी तुम्हाला का डावललं, स्वतःचा काहीच दोष नाही का? शिवेंद्रराजेंनी सुनावलं
- साताऱ्याच्या निकालाने राष्ट्रवादीत फुटीची चिन्हे; शशिकांत शिंदेंचे थेट संकेत
- एसटी संप आज मिटणार का? ११ वाजता राज्य सरकार आणि आंदोलकांमध्ये होणार महत्वाची बैठक
- निलेश लंके लावणार अवघ्या 1 रुपयात 101 शाही विवाह; पवार कुटुंबीय करणार कन्यादान
- साताऱ्यातील राष्ट्रवादी कार्यालयावर दगडफेक प्रकरणावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…