मुंबई : राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणावर नियमबाह्य आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीची नियुक्ती करण्यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला होता. याबाबतचं पत्र देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठवलं होतं. राजकुमार ढाकणे असं या राष्ट्रवादी नेत्याचं नावं आहे. फडणवीसांच्या पत्रानंतर आता राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणावरून राजकुमार ढाकणे यांची हकालपट्टी केली आहे. गृहविभागाने याबाबत अधिसूचना जारी केली आहे.
जावयाला समोर बसवून खडसेंची, ईडीकडून ९ तास मॅरेथॉन चौकशी; काय घडले, वाचा सविस्तर
राज्य पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी राज्य सरकारला राजकुमार ढाकणे यांच्याबाबत रिपोर्ट सोपवला. त्यात राजकुमार ढाकणे यांच्याविरोधात गंभीर गुन्हे नोंद असल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे तात्काळ राजकुमार ढाकणेंना राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाच्या सदस्य पदावरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १४ जुलै २०२० रोजी गृहविभागाने अधिसूचना जारी करत राजकुमार ढाकणे यांची राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणावर सदस्य म्हणून नियुक्ती केली होती. महाराष्ट्र पोलीस अधिनियमातंर्गत ही नियुक्ती झाली होती.
अजून एक जमीन प्रकरण खडसेंना भोवणार?, ईडीकडून पाळेमुळे शोधायला सुरुवात
त्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राजकुमार ढाकणे यांच्या नियुक्तीला आक्षेप घेत चौकशीची मागणी केली होती. तसेच याबाबत फडणवीसांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवलं होतं. त्यानंतर ढाकणे यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले. राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी या प्रकरणाची चौकशी केली. २०१५ मध्ये राजकुमार ढाकणे यांच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा पुण्यातील कोरेगाव पोलीस स्टेशनात नोंद आहे असं चौकशी अहवालात नमूद आहे. त्याच आधारे ढाकणे यांची हकालपट्टी केली आहे.
कोण आहे राजकुमार ढाकणे?
राजकुमार ढाकणे हे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसपासून पक्ष संघटनेत कार्यरत आहेत. गेली १७ वर्ष ते राजकारणात आहेत. तसेच ते उद्योजक आहेत. पुणे शहरातील येरवडा, गांधीनगर, फुलेनगर, शास्त्रीनगर, जयप्रकाश नगर याभागात त्यांचे वर्चस्व आहे.
Read Also :
- मोठी बातमीः भीमा-कोरेगाव प्रकरणात शरद पवारांची साक्ष नोंदवणार; चौकशी समिती समन्स पाठवणार!
- राऊतांच्या चमकोगिरीचा आणि सामनाच्या संपादकाचा काय संबंध? याचा खुलासा द्यावा – चित्रा वाघ
- सहकार क्षेत्रात केंद्राची ढवळाढवळ; मोदींचा ‘मास्टर स्ट्रोक’ शेतकऱ्यांचा विश्वास जिंकणार?
- अजून एक जमीन प्रकरण खडसेंना भोवणार?, ईडीकडून पाळेमुळे शोधायला सुरुवात
- ‘राम’भक्त मोदींनी नव्या मंत्र्यांना घालून दिली ‘लक्ष्मण’रेषा, या ३ तत्त्वांच्या पलीकडे जाल तर, खबरदार!