मुंबई : मुंबईतील शिवसेनेच्या एका आमदाराला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला थेट राजस्थानमधून अटक करण्यात आली आहे. मुंबईच्या क्राइम ब्रांचच्या टीमने रविवारी रात्री भरतपूरच्या सीकरी येथून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, आरोपीला मुंबईत आणण्यात आले असून सध्या त्याची कसून चौकशी केली जात आहे. सेक्सटॉर्शन प्रकरणात अडकविण्याचा प्रयत्न झालेल्या शिवसेना आमदाराने तात्काळ पोलीस तक्रार नोंदवल्याने आरोपीला अटक करण्यात क्राइम ब्रँचच्या टीमला यश आलं.
माजी खासदार राजू शेट्टी, मंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या पाठींब्याने बंटी पाटलांचे पारडे जड
शिवसेना आमदाराला 20 ऑक्टोबर रोजी रात्री एक मेसेज आला. हा मेसेज मौसमदीन नावाच्या एका व्यक्तीने केला होता. चॅटिंगमध्ये आपण महिला असल्याचं भासवून त्याने आमदाराकाडे मदत मागितली. आमदार देखील मदतीसाठी तयार झाले. त्यानंतर थोड्याच वेळाने आमदाराच्या मोबाइलवर एका महिलेचा व्हीडिओ कॉल आला.
कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपला ‘जोर का झटका’; सहा नगरसेवक करणार शिवसेनेत प्रवेश
या महिलेने आमदारशी 15 सेकंद बातचीत केली आणि त्यांच्याकडे मदत मागितली. दरम्यान, हा कॉल कट झाल्यानंतर काही वेळाने आमदाराच्या मोबाइलवर याच नंबरवरुन एक व्हीडिओ पाठविण्यात आला. जो एडिट करण्यात आला होता. हा व्हीडिओ पाठवून आरोपीने आमदाराकडे तात्काळ 5 हजार रुपयांची मागणी केली. आमदाराने देखील फोन-पे वरुन आरोपीला 5 हजार रुपये दिले. दरम्यान, दुसऱ्या दिवशी एका वेगळ्याच नंबरवरुन आमदाराला फोन आला. त्यावेळी आरोपीने पुन्हा एकदा अश्लील व्हीडिओच्या नावाखाली ब्लॅकमेल करत 11 हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर मात्र आमदाराने पोलीस ठाण्यात सेक्सटॉर्शनच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग केलं जात असल्याची तक्रार नोंदवली.
एसटी संपाबाबत शरद पवार चांगला निर्णय घेतील; खासदार नवनीत राणांचा विश्वास
दरम्यान, याच तक्रारीवरुन मुंबई क्राइम ब्रांचच्या टीमने फोन-पे नंबरवरुन आरोपी मौसमदीन याला ट्रेस केलं. या दरम्यान, पोलीस सतत त्याच्या लोकेशनवर नजर ठेवून होतं. जेव्हा मुंबई पोलिसांची टीम राजस्थानमध्ये पोहचली तेव्हा त्यांनी सीकरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधला आणि आरोपीला पकडण्यासाठी एक रणनिती तयार केली. पोलिसांना असा संशय होता की, जर ते दिवसा आरोपीला पकडण्यासाठी लोकेशनवर गेले असते तर आरोपी तिकडून पळून जाण्याची दाट शक्यता होती. अशावेळी पोलिसांनी रात्री 11 वाजेची वेळ निवडली. जेव्हा रात्री पोलीस तेसकी या गावी पोहचले तेव्हा आरोपी हा आपल्या मोबाइलवर चॅटिंग करत होता. तेव्हाच पोलिसांनी त्याला अटक केली.
Read Also :
- आटपाडी राडा प्रकरण भोवणार?; अटकेपासून वाचण्यासाठी पडळकरांची उच्च न्यायालयात धाव
- ‘शरद पवार यांच्या घरी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नी बैठक झाली तर वावगं काय?’ आव्हाडांचा रोखठोक सवाल
- सातारा जिल्हा बँकेत दोन दिग्गज नेत्यांचा निसटता पराभव; आमदार शशिकांत शिंदे, राज्य गृहमंत्री देसाई थेट पराभूत
- आमदार महेश लांडगेंची मानवता : संपकरी एसटी कामगारांच्या घरचे भरले ‘राशन’
- परमबीर सिंग भारतातच, ४८ तासांत हजर होतील; कोर्टात वकिलाचा दावा