मुंबई : भोसरी एमआयडी जमीन घोटाळ्याच्या चौकशीसाठी एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना, ईडीने अटक करून त्यांची तब्ब्ल १३ तास कसून केली. त्यानंतर बेड्या ठोकून त्यांची रवानगी १२ जुलैपर्यंत ईडीच्या कोठडीत करण्यात आली. या अटकेच्या कारवाईनंतर ईडीने, खडसेंना आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी यांनाही समन्स बजावलं. मात्र, मंदाकिनी खडसेंनी ईडीकडे निवेदन देऊन १४ दिवसांची वेळ वाढवून मागितली आहे.
शिवसेनेला धक्का: दोन बडे नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार
दुसरीकडे, ईडीने तब्ब्ल ९ तास खडसेंची चौकशी केली असून, अटकेत असलेले त्यांचे जावई गिरीश चौधरी यांना समोर बसवून, त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच, ४ कथित कंपन्यांतून ‘बेसकोम बिंट्कॉन’ कंपनीमार्फत वर्ग करण्यात आलेल्या रकमेबद्दलही त्यांच्याकडून माहिती घेण्यात आली. मात्र, या मॅरेथॉन चौकशीनंतर, ईडी कार्यालयातून बाहेर पडल्यावर, खडसेंनी माध्यमांशी बोलणं टाळलं आणि थेट आपल्या गाडीत बसून रवाना झाले.
पंकजा मुंडे वेगळा निर्णय घेतील असं वाटत नाही; भाजप नेते राम शिंदे म्हणतात….
मात्र, त्यांच्या वकिलांनी माध्यमांसमोर येऊन, “खडसेंची आजची चौकशी पूर्ण झाली आहे. आम्ही ईडीला सर्व प्रकारचं सहकार्य दिलं आहे. त्यांच्या संपत्तीची संपूर्ण चौकशी करण्यात आली आहे. ईडीला जी कागदपत्रे हवी होती, ती देण्यात आली आहेत. इतर कागदपत्रे जमा करण्यासाठी, १० दिवसांचा कालावधी मागितला आहे. पुढेही जेव्हा चौकशीसाठी आम्हाला बोलावण्यात येईल, तेव्हा आम्ही हजर राहू,” असं सांगितलं.
महाविकास आघाडीच्या नाटकीपणापासून आत्ताच सावध व्हा; खासदार सुजय विखेंचे जनतेला आवाहन
दरम्यान, यातच आता या प्रकरणासंबंधी एक मोठी माहिती समोर येत असून, खडसेंना क्लीन चिट देणारा झोटिंग समितीचा अहवाल, मंत्रालयातून गहाळ झाला असल्याची माहिती मुख्य सचिवांनी दिली आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली असून, अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. या जमीन घोटाळ्याच्या चौकशीसाठी झोटिंग समिती स्थापन करण्यात आली होती. यानंतर या समितीकडून संपूर्ण चोकशीअंती, खडसेंना क्लीन चीटही देण्यात आली. त्यामुळे, हा अहवालच सापडत नसल्याने, ईडीला चौकशीवेळी निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी, खडसेंकडे ठोस पुरावा उरला नाहीये.
Read Also :
- नाना पटोले महत्त्वाची व्यक्ती, काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे मोठी जबाबदारी; राऊतांची सावध भुमिका
- नारायण राणे इन्व्हेस्टमेंट अँड ग्रोथ कमिटीवर, कुणाला कोणती मिळाली कमिटी; वाचा सविस्तर
- शिवसेनेला मोठा धक्का, माजी राज्यमंत्री पटोलेंच्या उपस्थितीत करणार काँग्रेसमध्ये प्रवेश
- विधान परिषद १२ आमदार नियुक्तीचा पेच कायम : राज्यपालांनी ८ महिने उलटूनही निर्णय घेतला नाही
- “मी मंत्री झालो, मुंडे साहेब माझे नेते” पंकजांच्या भेटीनंतर भागवत कराडांना गोपीनाथ मुंडेंची आठवण