पुणे : आज सर्वजन देवेंद्र फडणवीसांना बोलत आहेत, पण तुम्ही मराठे असुन काय केलं. मराठा आरक्षणासाठी, फक्त नावाला लावा तुम्ही पाटील, जाधव, महाडिक लावा. देवेंद्र फडणवीसांनी आरक्षणासाठी प्रयत्न केले. पण आज जे एकत्र आलेत ते कायमस्वरूपी एकत्र राहतील, असा विश्वास व्यक्त करत. आज प्रत्येकालाच सत्ता हवी असते, पण आधीच आत्मचिंचन केलं असतं, तर आत्मक्लेष करायची वेळ आली नसती, असा टोला उद्यनराजें यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
“चला आता काँग्रेसला सुध्दा उध्दव ठाकरेंचे मूळ गुण कळू लागले”; मनसेचा खोचक टोला
कॅबिनेट मंत्री दिपक केसरकर यांची उद्यनराजे यांनी पुण्यात भेट घेतली. यानंतर उद्यनराजे यांनी पत्रकारांशी संवाद साधला ते म्हणाले की, ज्यांच्याकडे मराठा आरक्षणाची जबाबदारी होती त्या महाविकास आघाडी सरकारने त्यांच्या काळात त्यांनी काय केलं हे विचारा. आम्ही म्हणतो प्रत्येकाला आरक्षण द्या, कोणत्याही समाजावर अन्याय होता कामा नये, मग मराठ्यांना का आरक्षण दिलं नाही. एकनाथ शिंदे यांच्याकडे त्याचवेळी जर मराठा आरक्षणाचा प्रश्न दिला असता तर तो कधीच मिटला असता, असं म्हणत खासदार उद्यनराजेंनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.
“एक एक आमदार की किमत तुम क्या जानो सुबोध बाबू ;” अन् त्यावर पंकजा मुंडेंचा खुलासा
शिवसेना ठाकरेंची की शिंदे गटाची? असा प्रश्न विचारला असता उद्यनराजे म्हणाले की, यांनी संपुर्ण महाराष्ट्र माझा आहे. त्यांनी शिवाजी महाराजांच्या नावाने शिवसेनेची स्थापना केली मग मी शिवसेना माझी आहे असे म्हणायला पाहिजे का? असा सवालही उद्यनराजे यांनी केला.
“75 वर्षात पहिल्यांदाच आपल्या देशाला स्वच्छ विचारांचे पंतप्रधान लाभले”; नवनीत राणा
जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ महाबळेश्वर आणखी कसे पर्यटन आकर्षित करता येईल यासाठी प्रयत्न करायचे आहेत. रोजगार उपलब्ध करता येतील, यासंदर्भात दिपक केसरकरांसोबत चर्चा झाली. केसरकर माझे जुने मित्र आहेत. सावंतवाडीला आजोबांकडे जायचो तेव्हापासूनचे मित्र आहेत, असंही उद्यनराजे म्हणाले.
Read also
- “मराठी बाणा गुजरात्यांच्या चरणी वाहिला, ‘कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा ?”
- “असे दलबदलू काँग्रेसमध्ये देखील जातील..”; पेडणेकरांचा मुख्यमंत्री शिंदेवर हल्लाबोल
- “बाळासाहेबांचे विचार पुढे न्यायाचे आहे, अन् हे अजूनही खातेवाटपावर अडले आहेत”
- बावनकुळेंकडे भाजप प्रदेशाध्यक्षपद तर मुंबईचे अध्यक्ष म्हणून शेलारांची निवड
- “..म्हणुन मी उद्धव ठाकरेंवर बोलणे टाळतो”; दीपक केसरकरांचे स्पष्टीकरण