पुणे : गेल्या साडेचार वर्षात पुणे शहराची खड्ड्यात घातले असा आरोप करत राष्ट्रवादीने विकासाची पोलखोल स्पर्धा ठेवली आहे. त्यालाच प्रत्यूत्तर देण्यासाठी आता भाजपनेही पुणेकरांसाठी स्पर्धेचे आयोजन केले आहे. “राज्यात गेल्या दीड वर्षात सत्तेत असलेल्या महाआघाडी सरकारने पुणे शहरासाठी केलेले एखादे भरीव विकासकाम दाखवा आणि रोख १५००० रुपयांचे बक्षीस मिळवा,” अशी स्पर्धा शहर भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी जाहीर केली आहे.
हे पण वाचा : शहर राष्ट्रवादीमध्ये मिशन- २०२२ साठी अजित गव्हाणे यांचा चेहरा; माजी आमदार विलास लांडे केवळ ‘फोटोपुरतेच’ ?
राज्यात भाजपचे सरकार सत्तेत असताना मेट्रो, पीएमआरडीएची स्थापना, पुणे विकास आराखड्याला मान्यता, भामा आसखेड पाणीपुरवठा प्रकल्प, समान पाणीपुरवठा प्रकल्प अशा विविध प्रकल्पांमुळे शहराच्या नियोजनबद्ध विकासाला चालना मिळाली. महविकास आघाडी सरकार राज्याच्या सत्तेत आल्याने पुन्हा शहराच्या विकासाला खीळ बसली आहे, असे मुळीक यांनी पॉलिटिकल महाराष्ट्रच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
हे पण वाचा : राज ठाकरेंनी राष्ट्रवादीवर केलेल्या जातीयवादाच्या आरोपाला, शरद पवारांचे सडेतोड उत्तर
राष्ट्रवादी तसेच महाविकास आघाडी सरकारवर पुणेकर प्रचंड नाराज आहेत. याच भीतीने राष्ट्रवादीची पोलखोल स्पर्धेची नौटंकी सुरू आहे. याला उपरोधिकपणे उत्तर देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली आहे. त्याची उत्तरे ९९२२७४४६४४ या व्हॉट्सॲप नंबरवर पाठवावीत. राज्य सरकारचे भरीव विकासकाम सांगणाऱ्या पहिल्या तीन स्पर्धकांना प्रत्येकी पंधरा हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे’, असेही मुळीक यांनी सांगितले. त्यामुळे, पुण्यातील विकास कामांवरून सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकारण रंगण्याची चिन्हे दिसून येते आहेत.
Read Also :
- देवेंद्रजी, तुमची सात भेटली तर बैलगाडा शर्यत लवकर चालू करु – खासदार डॉ. अमोल कोल्हे
- आठवा महिना लागला तरी स्वतःचा पाय स्वतःच्याच धोतरात – शिवसेना
- शिवसेना आमदार यामिनी जाधव यांची आमदारकी धोक्यात; १५ कोटींच्या संपत्तीवर आयकर विभागाची टाच
- “आपला अनुभव किती, राजकीय कारकीर्द काय?, रुपालीताई तुमची राजकीय शूर्पणखा होऊ देऊ नका!”
- “बाळासाहेबांशी बेईमानी करणाऱ्या घरफोड्या शिवसैनिकाला स्मृतीस्थळाची भेट घेऊ देणार नाही!”