सोलापूर: माळशिरस येथील श्रीपुरमधील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२०-२१ मध्ये गाळप केलेल्या उसाच्या यापूर्वीचा हप्ता रुपये २१०० प्रमाणे अदा केलेला होता आणि आज रोजी रुपये १३१ प्रति मेट्रिक टन प्रमाणे दुसऱ्या हप्त्याची एकूण रक्कम रुपये १४ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये वर्ग करण्यात आलेली आहे. गळीत हंगाम २०२०-२१ मध्ये गाळपास आलेल्या उसाचे एकंदरीत प्रति टन रुपये २२३१ प्रमाणे शेतकऱ्यांना अदा करण्यात आलेले आहेअशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी दिली आहे.
हे पण वाचा, “उरलीसुरली राष्ट्रवादी काँग्रेस, आता उजनीच्या पाणी प्रश्नावरून धुळीला मिळेल” आमदार प्रशांत परिचारिक
हे पण वाचा, पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक आढावा: कशी जुळून आली नवीन सत्तेची समीकरणे?
विधानपरिषद आमदार प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना सुरु आहे. गाळप हंगाम २०२०-२१ मध्ये कारखान्याने १०,०६, ७७० मेट्रिक टन ऊस गाळप करून ११.४४ टक्के सरासरी साखर उत्तराने ११ लाख १३ हजार ५०० क्विंटल साखरेचे उत्पादन घेऊन श्री पांडुरंग साखर कारखान्याने आपली उद्दिष्टपूर्ती केली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाच्या महामारीमुळे शेतकरी अडचणीत आला होता मात्र श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२०-२१ मध्ये गाळप केलेल्या उसाला दुसरा हप्ता प्रति टन १३१ रुपये प्रमाणे ऊस बिल दिल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीतील हंगाम पूर्व मशागतीचे कामे करण्याकरिता आर्थिक मदत होणार आहे.
हे पण वाचा, प्रशांत परिचारक, रणजितसिंह मोहिते आणि समाधान अवताडेंच्या एकत्रीकरणामुळे राष्ट्रवादीची डोकेदुकी वाढणार
हे पण वाचा, कृष्णा कारखान्याच्या सभासदांच्या मनावर राज्य करणारे सहकारमहर्षी जयवंतराव भोसले आप्पा..
गालिप हंगाम २०२१-२२ साठी कारखान्याकडे जवळपास १४ हजार हेक्टर उसाची नोंद करण्यात आली आहे. यामधून ११ ते १२ लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट कारखाना व्यवस्थापनाने ठेवलेले आहे. गालित हंगाम २०२१-२२ सुरु करण्याच्या दृष्टीने कारखान्यांवर कामे प्रगतीपथावर आहेत आणि ती लवकरच पूर्ण होऊन गाळप हंगाम वेळेवर सुरु केला जाणार आहे. त्यासाठी आवश्यक असणारी तोडणी व वाहतूक यंत्रणा सक्षमपणे उभारण्यात आलेली आहे असे देखील कार्यकारी संचालकांनी सांगितलेले आहे.
हे पण वाचा,
पारनेर कारखाना पुन्हा सहकारात रुजू करण्यासाठी आमदार निलेश लंकेचे एक पाऊल पुढे
सहकारी साखर कारखान्यांच्या चौकशी प्रकरणी हसन मुश्रिफांचे चंद्रकांत पाटलांना खुले आव्हान
अहमदनगर जिल्ह्यातील ‘पारनेर साखर कारखाना’ चौकशीच्या भोवऱ्यात
अजित पवार यांचे मामा राजेंद्र कुमार घाडगे यांच्या कारखान्यवर कारवाईचा बडगा; ईडीकडून जप्तीचे आदेश