अहमदनगर: राज्यातील सर्वात श्रीमंत असलेल्या साई संस्थानच्या Shri Saibaba Sansthan Trust Shirdi अध्यक्षपदासाठी आता चांगलीच रस्सीखेच सुरु झाली आहे. साई संस्थान हे खूप मोठे संस्थान आहे. राजकीय आणि सामाजिक पार्शवभूमी असलेल्या साई संस्थानाला विशेष महत्व आहे. अध्यक्षपदासाठी जिल्ह्यातील चार आमदारांची नावे चर्चेत आलेली आहे. अध्यक्षपदासाठी नेमकी माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये साई संस्थानच्या अध्यक्षपदासाठी चुरस लागलेली आहे.
हे पण वाचा,“शिर्डीत रोजच विश्वस्त मंडळ जाहीर होतंय, सरकारला वाटेल तेव्हा ते नेमणूक करणार” सुजय विखे
हे पण वाचा, राज्यातील सर्वात श्रीमंत असलेल्या साई संस्थानाच्या अध्यक्षपदासाठी चार आमदारांची रस्सीखेच
आमदार निलेश लंके यांचे नाव शरदचंद्र पवार कोविड सेंटरच्या माध्यमातून देशभरात पोहोचले आहे. शिर्डी येथील श्री साई बाबा संस्थानाची अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर करण्यात आलेली आहे. आमदार निलेश लंके यांचे समाजकार्य अफाट आहे. आमदार निलेश लंके यांची साई बाबा संस्थान अध्यक्षपदी निवड करावी यासाठी अहमदनगर-पारनेर तालुक्यामधून मोठी मागणी होत आहे. श्री साई बाबा संस्थान अध्यक्षपदी आमदार निलेश लंके यांची निवड करण्यासाठी नगर तालुक्यातील खडकी ग्रामपंचायतीने ठराव केला आहे.यासंदर्भात सरपंच प्रवीण कोठुळे यांनी माहिती दिली आहे.
हे पण वाचा, साई संस्थानाच्या अध्यक्षपदाबाबतीत सत्यजित तांबे व आशुतोष काळे यांच्या नावासाठी मुबंईत खलबतं
हे पण वाचा, अगस्ती सहकारी साखर कारखान्यात मोठ्या राजकीय घडामोडींना वेग; सर्व संचालकांनी दिले राजीनामे
आमदार निलेश लंके कोविड सेंटरमुळे चांगलेच चर्चेत आलेले. अनेक मंत्री आणि इतरही पदाधिकाऱ्यांनी निलेश लंकेच्या कोविड सेंटरला भेट दिलेली आहे. निलेश लंके यांच्या समाजकार्याची दखल दस्तुरखुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया ताई सुळे यांच्यासह राज्यातील इतर नेत्यांनी देखील घेतली आहे. निलेश लंके यांच्या कोविड सेंटरमधून राज्यातील अनेक लोक उपचार घेऊन बरे होऊन गेलेले आहेत. साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात यावी खडकी ग्रामपंचायतीने केलेला ठराव मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पाठवण्यात येणार असल्याचे सरपंच कोठुळे यांनी सांगितले आहे.
हे पण वाचा “निळवंडे धरणाच्या कामाला एकही रुपया कमी पडू देणार नाही” जलसंपदा मंत्री जयंत पाटील
हे पण वाचा नगरच्या महापौर पदाच्या दावेदार रोहिणी शेंडगे यांचा मार्ग सुकर; रिता शैलेश भाकरेंची बिनशर्त माघार
उच्च न्यायालयाने विश्वस्थ निवडीबाबत राज्य सरकारला ठणकावल्याने साई मंदिर उघडण्यापूर्वीच विश्व्स्त नियुक्तीचा बिगुल वाजलेला आहे. साई संस्थानाच्या अध्यक्षपदासाठी आमदार रोहित पवार, आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार निलेश लंके आणि आमदार आशुतोष काळे यांच्यासह युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांची नवे चर्चेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अहमदनगर जिल्ह्यात आमदारांचे संख्याबळ जास्त असल्याने राष्ट्रवादी काँगेसचाच अध्यक्ष होणार अशी चर्चा रंगलेली आहे.
हे पण वाचा
नगरच्या महापौर पदाच्या दावेदार रोहिणी शेंडगे यांचा मार्ग सुकर; रिता शैलेश भाकरेंची बिनशर्त माघार
राहुरी तालुक्यासाठी महाविकास आघाडीतील मामा-भाचे वापरणार आपले ‘राजकीय’ वजन
राहुरी तालुक्यासाठी महाविकास आघाडीतील मामा-भाचे वापरणार आपले ‘राजकीय’ वजन