पुणे : भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेहमी टीकेची जुगलबंदी सुरू असते. यात कधी-कधी अतिरेक होतो. चंद्रकांत पाटील यांच्याकडून असेच झाले. शरद पवारांवर टीका करताना ते म्हणालेत, राज्यात शरद पवारच आम्हाला आव्हान नाही. कारण ५४ आमदाराच्या वर त्याला आम्ही जाऊ दिले नाही. सगळ आयुष्य गेल, कधी ६० वर तो गेला नाही.
शिवसेनेत असतो तर मुख्यमंत्री झालो असतो, पण…; छगन भुजबळ
चंद्रकांत पाटलांनी पवारांचा एकेरी उल्लेख केल्याने राष्ट्रवादीचे नेते संतापलेत. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी पाटलांना उत्तर दिले. राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता संदीप काळे याने पाटीलांना ‘नवरत्न’ तेलाची बाटली पाठवून संदेश दिला‘ आपण कुणाबद्दल बोलतो, आपली तेवढी उंची आहे का? बोलताना जरा डोक शांत ठेवून टीका करत जा, म्हणून हे नवरत्न तेल तुमच डोक शांत करण्यासाठी पाठवत आहे. आणि तरीही तुमच डोक शांत नाही झाल तर, त्याचा इलाज मी स्वखर्चाने करतो.’
राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनीही चंद्रकांत पाटील यांना सुनावले. ‘चंद्रकांत पाटील, आपल जेवढे वय आहे, तेवढी त्यांची कारकीर्द आहे. आपण बोलताना जरा सांभाळून बोलायला हव. मी तुम्हाला हे परत परत सांगते आहे. राजकारणात एकेरी भाषेत बोलू नये.’
Read Also :
- केंद्र सरकार महावितरणचं खाजगीकरण करण्याच्या तयारीत? ऊर्जा राज्यमंत्र्यांचं खळबळजनक विधान
- पिंपरी चिंचवडच्या लोकांनी मला सहा वेळा निवडून दिले; निवडणुकीच्या रणांगणात पवारांचा पहिला डाव
- भाजपच्या महापौरांनी घेतला शरद पवारांचा आशिर्वाद; पिंपरी चिंचवडमध्ये राजकीय तर्कवितर्कांना उधान
- उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यात माझा किंचीत हात होता; शरद पवारांची दिली कबुली
- साहेब, राज्यातील विद्यार्थ्यांच्या वडिलांच्या स्वप्नांचा पण विचार करा ना – चित्रा वाघ