राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र येत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने पारनेरची पुनरावृत्ती करत शिवसेनेला पुन्हा एकदा धक्का दिल्याची बाब समोर आली आहे. नाशिकमधील सिन्नर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे पाच नगरसेवक फुटले
सिन्नर नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली. त्यावेळी शिवसेनेच्या बाळासाहेब उगले यांनी बंडखोरी करीत शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार प्रणाली गोळेसर यांच्याविरोधात उपनगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरला होता. त्यावेळी राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी बाळासाहेब उगले यांच्यासाठी शिवसेनेचे पाच नगरसेवक फोडले आणि स्वतःच्या १० नगरसेवकांची मतेही बाळासाहेब उगले यांच्या पारड्यात टाकली व त्यांना उपनगराध्यक्षपदी निवडून आणले.
बाळासाहेब उगले यांनी बुधवारी झालेल्या निवडणुकीत आमदार माणिकराव कोकाटे गटाच्या सहाय्याने पंधरा मते मिळवली. तर प्रणाली गोळेसर यांना 14 मतांवर समाधान मानावे लागले. शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी पक्षाविरोधात मतदान केल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीने पारनेरमध्येही शिवसेनेचे पाच नगरसेवक फोडले होते. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रचंड नाराज झाले होते. शेवटी शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची समजूत काढावी लागली होती. आता पुन्हा राष्ट्रवादीन काँग्रेसने नवीन खेळी खेळात सिन्नरमध्ये उपनगराध्यक्षपद मिळविले