राजस्थानमध्ये मागील काही दिवसांपासून सत्ता संघर्ष सुरू आहे. त्यातच एक कथित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. राजस्थानचे सभापती सी.पी. जोशी हे या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
कथितरित्या राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे पुत्र वैभव हे सभापती सी. पी. जोशी यांनाना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते. यावेळी दोघांमधील चर्चेचा हा व्हिडीओ असल्याचे सांगितले जात आहे.
वैभव गेहलोत यांच्याशी बोलताना सी.पी. जोशी म्हणत आहेत की, सरकारबद्दलचे हे प्रकरण खूपच टफ आहे. 30 30 जण निसटले असते तर आपण काहीच करू शकत नाही. आपण कंठशोष करत बसलो असतो अन् त्यांनी सरकार पाडले असते. आपल्या हिशेबाने त्यांनी संपर्क साधला, यामुळे जमले. इतर कुणाला हे जमले नसते.
जोशींचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने आता पुन्हा एकदा राजस्थानच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. भाजप आता त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे.