मुंबई: काँग्रेस शिवसेना राष्ट्रावदी मिळून महाविकास आघाडीचे सरकार बनले आहे. परंतू महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना, शिवसेने आपल्या हिदुत्वास काळीमा फासण्याचे काम केले आहे. त्यांनी जनता कधीच माफ करणार नाही, असे विधान भाजपाचे विरोधसभा विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केले आहे.
प्रविण दरेकर म्हणाले की, शिवसेने महाविकास आघाडी सरकार सोबत जाऊन हिदुत्वास काळीमा फासण्याचे काम केले आहे. त्यांच्या कुठल्या हिदुत्व वक्तव्यांना जनता मनावर घेणार नाही. तसेच शिवसेनेची राम मंदिरावची भुमिका बघाता, त्यांना लोक कधिच माफ करणार नाहीत. राम मंदिर आणि हिंदुत्वाचा विचार केवळ सत्तेसाठी शिवसेने बासनात गुंडाळून ठेवला आहे.
हिंदुत्वाचा विचार बासनात गुंडाळून केवळ सत्तेसाठी विरोधी विचारांच्या पक्षाशी हातमिळवणी केल्यामुळे शिवसेनेच्या वक्तव्यांना समाज मान्यता राहणार नाही! pic.twitter.com/S34rbo13za
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) June 15, 2021
“शिवसेनेची भूमिका राम मंदिर विरोधी”
“भाजपसाठी हा मुद्दा राजकीय नाही. संजय राऊत आणि शिवसेना या दोघांनाही राम मंदिराच्या कामात अडंग आणण्याची भूमिका घेण्यासाठी प्रवृत्त कोण करत आहे, पायाभरणी कार्यक्रमही ई पद्धतीने घेण्याची मागणी होती, आता सामान्य नागरिकांच्या स्वेच्छेने येणाऱ्या निधीतून राम मंदिराचं काम होतंय. आधी म्हणायचं पहिले मंदिर फिर सरकार, पण सरकार आल्यावर मंदिर निर्मितीत अडंग आणायचा, या पद्धतीची राम मंदिर विरोधी भूमिका शिवसेना घेत आहे, असं आमचं मत आहे.
संजय राऊत काय म्हणाले?
“राम मंदिराचा मुद्दा आता राजकारणातून दूर व्हायला हवा. राम मंदिराचं राजकारण केव्हातरी संपावं, आता हे वर्गणीचं काय प्रकरण काढलं आहे नवं, हे माहित नाही. चार लाख स्वयंसेवक गावोगावी जाऊन वर्गणी गोळा करणार आहेत. मला असं वाटतं, अयोध्येच्या राजाला, जी देशाची अस्मिता आहे… घरोघर जाऊन वर्गणी घेणं लोकांना पटत नाही.. ” अशी टीका संजय राऊत यांनी केली होती.