शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा, असा संदेश जगाला देणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मगावी म्हणजे आंबवडे या ठिकाणी असलेली शाळा निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात जमीनदोस्त झाली. दापोलीतील ग्रामीण भागात असलेल्या या शाळेची डागडूजी करण्यासाठी आता भाजपा आमदार तथा शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्या साथीने पिंपरी-चिंचवड भाजपा कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे.
मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात निसर्ग चक्रीवादळामुळे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मगाव आंबवडे येथील शाळेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर आमदार महेशदादा लांडगे यांनी सहा महिन्यांचे वेतन नुकसानग्रस्त भागातील नागरिकांच्या मदतीसाठी दिले. तसेच, शाळेच्या पुनः उभारणीसाठी मदत करण्याचा संकल्प केला आहे.
राज्याचे विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ‘एक हात मदतीचा’ उपक्रमांतर्गत आमदार महेश लांडगे यांनी ‘निसर्ग’ चक्रीवादाळत नुकसान झालेल्या कोकणातील विविध गावांमध्ये मतदकार्य करण्याचा निर्धार केला आहे. त्यांनी आज २२ जुलै माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिम्मित ही मदत केली आहे.
माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आमदार महेश लांडगे आणि भाजप कार्यकर्त्यांच्या या कामाचे कौतुक केले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यातील जालगाव या ठिकाणी सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ नावाची संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून मंडणगड येथील लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आहे. याठिकाणी सांस्कृतिक भवन, जिमखाना, महिला वसतिगृह आहे. मंडणगडपासून सुमारे १७ किमी अंतरावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मगाव आंबवडे आहे.
आंबडवे येथील आपल्या शाळेच्या इमारतीवरील व सांस्कृतिक भवनावरील एकही पत्रा व शेड शिल्लक राहिलेली नाही . तशीच परिस्थिती मंडणगड कॉलेज व बाकी शाळांची झालेली आहे . किमान 50 ते 60 लाखांचे नुकसान आपल्या सर्व प्रकल्पाचे झाले आहे. गेल्या महिनाभरात पत्रे बसवण्याचे काम प्रगतीपथावर आहे. सांस्कृतिक भवन आणि महिला वसतिगृहाचे काम मदतीच्या प्रतीक्षेत आहे. मंडणगडच्या युनिटचे मोठे नुकसान झाले. संस्थेच्या सर्वच पाच युनिटमधील वीज पुरवठा व्यवस्था कोलमडली आहे
संस्थेला महाराष्ट्र शासनाचा मनाचा शाहू- फुले-आंबेडकर हा पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे. परंतु, निसर्ग चक्रीवादळ होवून एक महिना झाला. पण, राज्य सरकार अथवा जिल्हा प्रशासनाकडून कसलीही मदत संस्थेला मिळालेली नाही. त्यामुळे आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वात भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या मदतीसाठी गावकऱ्यांनी त्यांचे आभार मानत त्यांचा सत्कार केला आहे.