अहमदनगर : पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरेंच्या एका आडिओ क्लिपने सध्या अहमदनगर जिल्हा आणि राज्यात खळबळ उडवून दिली असून, पारनेरच्या लोकप्रतिनिधीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करण्याचा इशारा त्यांनी यात दिला आहे. यामध्ये त्यांनी थेट कोणत्याही लोकप्रतिनिधीचे नाव घेतले नसले, तरी त्यांच्या बोलण्यातून रोख हा स्थानिक आमदार निलेश लंकेकडे असल्याचे दिसून येत आहे, तर निलेश लंकेंनीही उलट ज्योती देवरेंवर आरोप केले आहेत.
ब्रेकिंग! पारनेर तहसिलदाराने आमदार लंकेच्या जाचाला कंटाळून दिला आत्महत्येचा इशारा!
दरम्यान, या वादावर आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी आपली प्रतिक्रिया दिली असून, “मला या दोघांच्याही भांडणात पडायचं नाही, कुणी कुणाला काय बोलावं, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यावरही मला भाष्य करायचं नाही, पण मी तहसीलदार मॅडमना एवढंच सांगतो; की आत्महत्येचा विचार चांगला नाही, तो डोक्यातूनच काढून टाका,” असा सल्ला त्यांनी तहसीलदार ज्योती देवरेंना दिला आहे.
महिला तहसीलदार ऑडिओ क्लिप प्रकरणात अण्णा हजारेंनी घेतली उडी; काय म्हणाले नेमकं…
हे प्रकरण बाहेर आल्यावर काही दिवसांपूर्वी लंके यांनी, हजारेंची भेट घेऊन या सगळ्या प्रकारची सविस्तर माहिती दिली होती. तेव्हा देखील अण्णांनी यावर बोलताना, पारनेर तालुक्याची बदनामी थांबवण्याचे आवाहन केले होते. याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत बोलणार असल्याचेही त्यांनी लंके यांना सांगितले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी या प्रकरणावर भाष्य केले आहे.
आमदार निलेश लंकेंवर केलेल्या गंभीर आरोपावर सुप्रिया सुळे म्हणातात…
दुसरीकडे, यावर इंदुरीकर महाराज यांनीही आपल्या कीर्तनाच्या खास शैलीतून प्रतिक्रिया दिली असून, “कितीही कुत्री भुंकली, तरी हत्ती चालत राहतो. तसंच लंके तुम्ही देखील विरोधकांच्या टीकांकडे दुर्लक्ष करून, वाटचाल करीत रहा. पुढील २५ वर्षे तुम्हाला धोका नाही,” अशी स्तुतीसुमनं लंके यांच्यावर उधळली आहेत. भाळवणी इथल्या लंके यांच्या कोविड सेंटरमध्ये सध्या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पार पडलेल्या कीर्तनात त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
Read Also :
- “१२ कोटी जनतेला विचारा उत्कृष्ट मुख्यमंत्री कोण?” बावनकुळेंचे ठाकरे सरकारला आव्हान
- देशमुखांवर अटकेची टांगती तलवार! ईडीकडून केली गेली पुन्हा मोठी कारवाई
- महाविकास आघाडी सरकार म्हणजे गुळाच्या ढेपेला चिकटलेले मुंगळे – देवेंद्र फडणवीस
- “भुजबळ संपल्यात जमा; मुख्यमंत्र्यांना कायमचंच घरी बसवू,” नारायण राणेंचा हल्लाबोल
- छगन भुजबळ अचानक दिल्लीला रवाना; देशातील बड्या वकीलाची घेणार भेट