मुंबई : सहकारतपस्वी स्व. गुलाबराव पाटील जन्मशताब्दी सोहळ्याच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील ,सतेज पाटील, प्रवीण दरेकर ,विश्वजित कदम, शंभूराजं देसाई उपस्थित होते. यावेळी, मुख्यमंत्र्यांनी, ‘महाराष्ट्र म्हणजे हिम्मत आली, लढवय्येपणं आलं, जिद्द आली. देशाला दिशा दाखवणारं राज्याचं सहकार क्षेत्र आहे,’ असं मत व्यक्त केलं.
आरक्षणाचा अध्यादेश न्यायालयात टिकला नाही तर ओबीसींच्या डोळ्यात धुळफेक ठरेल
तसेच, ‘सहकार क्षेत्र हे काही लेचेपेचे क्षेत्र नाही! या क्षेत्राच्या समृद्धीसाठी काम करणं सरकारचं काम आहे. त्याची सुधारणा आणि त्याचं वैभव वाढवणं हे देखील काम सरकारचं आहे. त्यामुळे, तांदळातून जसे खडे वेचून काढावे लागतात, तसे काही खडे वेचून काढून सहकाराचा भात आहे, त्याचा सुवास आणि समृद्धी वाढवण्यासाठी महाविकास आघाडी सरकार काम केल्याशिवाय राहणार नाही,’ असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी भाजप नेत्यांना टोले लगावले.
महापालिकेवर ‘मनसे राज’ आणण्यासाठी राज ठाकरे पुन्हा एकदा नाशिक दौऱ्यावर
‘राजकारणाच्या पलीकडे जायचं, म्हणजे नेमकं कुठं जायचं, कोणी जायचं, कसं जायचं हेही आम्हाला सांगा. आमची तयारी आहे,’ अशा शब्दात त्यांनी प्रविण दरेकरांना टोला लगावला. तसेच, ‘मनोगतात एक वाक्य आहे, केवळ दिल्लीला जाऊन बसण्यापेक्षा महाराष्ट्र उभा करेन. हा क्रांतिकारक विचार गुलाबराव पाटील यांनी केला. नाहीतर अनेकांना केवळ दिल्लीला उभचं राहावं लागतं. त्यांना बसायलाचं मिळत नाही,’ असा निशाणा त्यांनी साधला.
मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या, संभाजीराजे कडाडले…
त्यामुळे, उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला आणि मुख्यमंत्र्यांनाही हसू आवरता आलं नाही. त्यानंतर त्यांनी हसू आवरत भाषण पुन्हा सुरु केलं. “अशा वातावरणात बसण्याची संधी नाकारून, मी माझ्या राज्याला उभा करेन. हाच एक मोठा क्रांतीकारक विचार आहे. मी, माझं राज्य आणि अस्मिता हा खरंच फार मोठा विचार आहे.” असं त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमात सहकारतपस्वी गुलाबराव पाटील यांच्या आयुष्यावर आधारित चित्रफीतीचे अनावरण करण्यात आलं.
Read Also :
- शिवसेनेला पडली मोठी खिंडार: ७ नगरसेवक फोडले, अजून १२ जण पक्ष सोडून जाणार
- भाजप नगरसेवकांने केला महिलेचा विनयभंग? किरीट सोमय्या म्हणतात, चौकशी झाली पाहिजे
- ‘राजकारणात कुणाला कुठल्या चेंडूवर बोल्ड करायचे, हे क्रिकेटमुळे चांगले माहिती!’
- मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबाद दौऱ्याला वाढता विरोध, मनसेही मैदानात
- सोशल मीडियावर अॅक्टिव्ह व्हा, दिवसातून किमान एक तरी पोस्ट शेअर करा – राष्ट्रवादीचे आवाहन