मुंबई : काल देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांची पहिलीच पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत त्यांनी पुढील पाच वर्षात काय काय विकासकामे केली जातील, याचा उलगडा केला. तर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार विधिमंडळाच्या नागपुर अधिवेशनापुर्वी करण्यात येईल, असे संकेत देखील त्यांनी दिले आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार हा ११ किंवा १२ डिसेंबरला होणअयाची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा…राहुल नार्वेकर सुध्दा पुन्हा येणार…? कोण होणार नवे विधानसभा अध्यक्ष ?
देवेंद्र फडणवीस सरकारचा पहिला हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबरपासून नागपूर येथे सुरू होत आहे. त्यापुर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे. विधानसभा सदस्यांच्या शपथविधीचे अधिवेशन ७ ते ९ डिसेंबर दरम्यान मुंबईत होणार असून राज्यपालांचे अभिभाषण निवड ९ डिसेंबरला होणार आहे. तर काही नावांवरून महायुतीत गोंधळ सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
भाजपने अब्दुल सत्तार, दिपक केसरकर, तानाजी सावंत आणि संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाला आक्षेप घेतल्याची माहिती समोर येत आहे. यासह गेल्या मंत्रिमंडळातील कामगिरी समाधानकारक नसून अन्यही काही कारणे त्यासाठी आहेत. तरीही यापैकी काही मंत्र्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याचा शिंदे यांचा प्रस्ताव आहेत. शिवसेनेतील कोणत्या नेत्यांना मंत्रिमंडळात संधी द्यायची, यावरूनही गोंधळ असून अनेक नेत्यांनी शिंदे यांची भेट घेऊन मंत्रिपदाची मागणी केलीय.
दरम्यान, भाजपकडे २० मंत्रिपदे असतील असे समजत आहे. पण त्यापैकी काही रिक्त ठेवली जाणार आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यात कोणाला संधी द्यायची, याबाबत फडणवीस यांची पक्षश्रेष्ठींशी चर्चा करणार आहेत. सत्तरी ओलांडलेल्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान न देता नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी. असा विचार भाजपचा आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, मंगलप्रभात लोढा आदी ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यासंदर्भातही विचारविनिमिय सुरू आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“मुख्यमंत्री बदलतो, पण अजित पवार झालेहेत पर्मनंट उपमुख्यमंत्री”, नवा रेकॉर्ड अलर्ड मोडवर..
हेही वाचा…उपमुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे राजी, ? पण गृहमंत्रीपदाबाबतचा पेच कायम, काय घडतंय?
हेही वाचा…मोठी बातमी…! बावनकुळेंसह, पडळकर, आमश्या पाडवींचं विधान परिषदेचं सदस्यत्व रद्द, कारण काय ?
हेही वाचा…एकीकडे शपथविधी तर दुसरीकडे राज्यभर EVM विरोधात आंदोलन…?