बॉलिवूड अभिनेता सोनू सूद आज 47 वा वाढदिवस साजरा करत आहे. आज त्याने वाढदिवसानिमित्त चाहत्यांसह अनेकांसाठी एक मोठं सरप्राईज दिलं आहे. आज बर्थ डे च्या निमित्ताने सोनूने 3 लाख नोकर्यांची घोषणा केली आहे. यासाठी सोनू सुदने अमेझॉन, सेडेक्सो सारख्या बड्या कंपन्यांसोबत हातमिळवणी केली आहे.
आता काही बड्या कंपनींमध्ये नोकरीची संधी आणि कामगार यांच्यामध्ये अभिनेता सोनू सुद दुवा बनणार आहे. दरम्यान यामुळे अनेकांना नोकरीच्या संधीची माहिती मिळेल. कोरोना व्हायरस लॉकडाऊनच्या काळात बेरोजगारांना हाताला काम मिळेल.
सोनू सुदने ट्वीट करत याची माहिती देताना, ‘ आज माझ्या बर्थ डे दिवशी स्थलांतरित मजुरांसाठी PravasiRojgar.com चा 3 लाख नोकर्यांसाठी करार झाला आहे. यामध्ये उतम वेतन,PF,ESI सोबतच अन्य लाभदेखील दिले जातील. AEPC, CITI, Trident, Quess Corp, Amazon, Sodexo, Urban Co , Portea सह अन्य कंपन्यांचे आभार!