अहमदनगर – जिल्हातील सर्व व्यवसाय पूर्ण क्षमतेने सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र,शिर्डीतील साईमंदिर सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय झाला नाही. साई मंदिरावरच शिर्डीच अर्थकारण अवलंबून असल्याने साई मंदिर खुले करण्याची मागणी शिर्डीकरांनी केली आहे.
साईमंदिर खुले करा
कोरोनाचे राज्यात रुग्ण वाढू लागल्यानंतर 5 एप्रिला रोजी साईबाबांचे मंदीर भक्तांना दर्शनासाठी बंद करण्यात आले. मात्र, मंदीरातील दैनंदिन पूजा विधी सुरु आहेत. आता लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर इतर शहरे तशीच गावे पुर्वपदावर येत आहेत. मात्र, शिर्डीचे समीकरण वेगळ आहे. साईमंदिर खुले असेल तरच भाविक शिर्डीला येतात आणि त्यानंतर व्यवसायाला गती मिळते. मंदिर बंद असल्याने भाविक शिर्डीला येऊ शकत नाहीत त्यामुळे अनलॉक झाले तरी मंदीरच खुले नसल्याने व्यवसाय सुरू करून उपयोग नाही, अशी अवस्था आहे. आसपासचे शेतकरी शिर्डीतील हॉटेल्स हातावर काम करणारी अनेक लोक, हार, फुल, प्रसाद विक्रेते, रेस्टॉरंट अश्यांची आर्थिक परिस्थिती लॉकडाऊनमुळे बिघडली आहे. त्यामुळे लवकरात लवकर साईमंदिर खुले करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
व्यवसायिकांची आर्थिक कोंडी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू केल्याने साईमंदिर बंद करण्यात आले. त्यामुळे शिर्डीतील अर्थकारण पुर्णत: ठप्प झाले आहे. शिर्डीतील सर्व व्यवसाय हे साई मंदिरावर अवलंबून असल्याने मंदिर खुले करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. लॉकडाऊनमुळे हार-फुल विक्रेते, हॉटेल व्यवसायिकांची आर्थिक कोंडी झाली आहे. मंदिर खुले करण्याचा निर्णय तात्काळ घ्यावा अन्यथा पुन्हा एकदा आंदोलन करण्याची भुमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
Read Also :
- ‘कोविडला निमंत्रण देणारी गर्दी चालणार नाही”- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- पहाटेच्या शपथविधीनंतर पवार साहेबांनी घरी घेतलं नसतं तर तुमची काय लायकी राहिली असती
- “संभाजीराजे आता आमच्याच मागं येताय ना?”, मराठा आंदोलनाच्या घोषणेनंतर मेटेंची टीका
- …अन्यथा थेट जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई करू; मुख्यमंत्र्यांचा इशारा
- भाजप सत्तेसाठी तळमळतोयं, आमदारांमध्ये प्रचंड नाराजीचं वातावरण आहे – एकनाथ खडसे
- ‘काय नाटक आहे, प्रॉपर्टीसाठी भाऊ कोर्टात अन्….